किनवट : दलित , शोषित , श्रमिक , उपेक्षितांच्या हालअपेष्टा , दुःख , समस्या साहित्याच्या माध्यमातून जगासमोर मांडणारे साहित्यरत्न , थोर कामगार नेते, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील झुंजार लढवय्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं कार्य वंचितांना सदैवं सन्मानाचं बळ देणारं आहे. असे प्रतिपादन आमदार भीमराव केराम यांनी केले.
शनिवारी (दि. १) सकाळी ९ वाजता येथील पुतळ्याजवळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी प्रारंभ निमित्त समस्त मातंग समाज बांधवाच्या वतीने आयोजित वंदन कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की,या पुतळा परिसराचं सुशोभिकरण करण्याचं काम करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. सध्याची स्थिती निवळताच हे काम सुरु होईल. यावेळी जन्मशताब्दी निमित्त शंभर गरजू कुटूबांना त्यांचे हस्ते अन्नधान्य किट देण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते मारोती सुंकलवाड यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर नगराध्यक्ष आनंद मच्छेवार मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, आमदार भीमराव केराम यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. काही तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर या कामाला शुभारंभ होणार आहे. याप्रमाणेच शहरातील सर्वच पुतळ्यांचं सुशोभीकरण करण्याचं काम मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्माणीवार , के. मूर्ती , रिपाईंचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक , सेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे,भाजपा तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, शहराध्यक्ष नगरसेवक श्रीनिवास नेम्माणीवार, नगरसेवक जहिरोद्दीन खान, माजी उपनगराध्यक्ष अनिल तिरमनवार , प्रा . डॉ. सुरेंद्र शिंदे, आनंद भालेराव, डी .एन. बटूर, मधुकर अन्नेलवार, अनिरूद्र केंद्रे , गोवर्धन मुंडे, लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, शंकर भंडारे, के. स्वामी, प्राचार्य डॉ. सागर शिल्लेवार, आमदारांचे जनसंपर्क अधिकारी संतोष मरसकोल्हे, स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत दुधारे, प्रा . डॉ. आनंद भालेराव , प्रा. डॉ. पंजाब शेरे, सुरेश पाटील, आदी मान्यवरांसह पत्रकार व अण्णाभाऊ साठेप्रेमी नागरिकांनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पूण वंदन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मातंग समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष के.मूर्ती व कार्याध्यक्ष दुर्गादास बटूर यांनी पुढाकार घेतला.





No comments:
Post a Comment