नवी मुंबई : मनाली आनंदराव सुर्यवंशी हिने जन्मत:च असलेल्या सेरेब्रल पाल्सी (मेंदुचा पक्षाघात) या आजाराशी लढा देत १० वी च्या परीक्षेत ८३.४०% गुणांची भरारी घेतल्याने सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे.
स्वतःच्या पायावर उभेही राहु न शकणारी, हातात पेनही सरळ धरता येत नसताना, लेखनिकची सुविधा मिळाली असतांनाही केवळ स्वतःच्या हातानी पेपर लिहिण्याची कमालीची जिद्द बाळगुन तिने चिकाटी व अपार मेहनतीने हे कौतुकास्पद यश संपादन केले आहे.
अभ्यासाबरोबरच शाळेच्या इतर उपक्रमा मध्येही ती मोठ्या हिरीरीने सहभागी होत असे. मनाली जुईनगर मराठी विद्यालय जुईनगर, नेरूळ नवी मुंबई येथे शिकत होती.
तिने आपल्या यशात आई-वडील, शाळेच्या मुख्याध्यापिका अनन्या सावंत, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व श्रीमती आर.टी.सिनलकर यांचे विशेष योगदान असल्याचे सांगितले. सर्वांनी तिचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




No comments:
Post a Comment