किनवट : येथील कोविड केअर सेंटरमध्ये आषोधोपचार घेणाऱ्या रुग्णांना पिण्याच्या गरम पाण्यासाठी आमदार भीमराव केराम यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा शहर शाखेच्या वतीने 20 इलेक्ट्रीक हिट केटल भेट देण्यात आले.
शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने येथील तहसिल कार्यालयाच्या नविन इमारतीत स्थापित कोविड केअर सेंटर येथे औषोधोपचारासाठी दाखल रुग्ण संख्याही वाढू लागली आहे. या रुग्णांना उपलब्ध करून द्यावयाच्या सुविधेची बाब हेरून भारतीय जनता पार्टी शहर कार्यकारणीच्या वतीने आमदार भीमराव केराम यांच्या वाढदिवसानिमित्त व स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पिण्याच्या गरम पाण्याकरिता गरम 2 लिटर क्षमतेच्या 20 इलेक्ट्रीक हिट केटल तहसीलदार उत्तम कागणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय मुरमुरे, डॉ. भाग्यश्री वाघमारे यांच्या उपस्थितीत भेट देेण्यात आल्या.
शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्माणीवार, सतीष बिराजदार, प्रा.विश्वास कोल्हारिकर, बाळकृष्ण कदम, स्वागत ऐनेनिवार, नरसिंग तक्कलवार, नरेंद्र सिरमनवार, आकाश भंडारे, कृष्णा बासटवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला.
यावेळी नगरपरिषद बांधकाम सभापती वेंकट नेम्मानिवार, नगरसेवक शिवा आंधळे,भाजप तालुका उपाध्यक्ष सतीष नेम्माणीवार, राजेन्द्र भातनासे, अजय कदम, श्रीकांत माने आदींसह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.




No comments:
Post a Comment