किशनराव पुरभाजी मोरे यांचे निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, August 16, 2020

किशनराव पुरभाजी मोरे यांचे निधन

 


भोकर : येथून जवळच असलेल्या मौजे रेणापूर येथील आंबेडकरी चळवळीतील  कार्यकर्ते किशनराव पुरभाजी मोरे यांचे वयाच्या 99 व्या वर्षी वार्धक्याने रविवारी (दि. 16 ) सकाळी 9. 30 वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात 5 मुले, 3 मुली, सुना, जावई, नांतवंडे असा मोठा परीवार आहे.  त्यांच्या पार्थिवावर रविवारी (दि.16 )  दुपारी 2:00 वाजता रेणापुर  येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

             सामाजिक जाणीव असलेले जुन्या फळीतील ते कार्यकर्ते होते. त्यांनी आपल्या मुला - मुलींना उच्च शिक्षीत केले असून शिक्षणाशिवाय प्रगती नाही, हा संदेश समाजात रुजवून एक आदर्श निर्माण केला आहे. किनवट तालुक्यातील पाटोदा (बुद्रूक ) केंद्राचे केंद्र प्रमुख सुभाष मोरे यांचे वडील व महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, गोकुंदा येथील शिक्षक मुकूंद मुनेश्वर यांचे ते सासरे होत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News