नांदेड, (जिमाका) दि. 16 :- येथील माता गुजरीजी विसावा उद्यान परिसरासह व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा गांधी पुतळापर्यंतच्या परिसरातील मुख्य रस्त्यावर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश निर्गमीत केले आहेत. या आदेशानुसार 16 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून ते गुरुवार 17 सप्टेंबर 2020 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत उपोषणे, धरणे, मोर्चा, रॅली इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास प्रतिबंधीत केले आहे.




No comments:
Post a Comment