किनवटमध्ये शुक्रवारी (ता.18) 21 बाधितांची भर , 1 रुग्णांचा मृत्यू - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, September 18, 2020

किनवटमध्ये शुक्रवारी (ता.18) 21 बाधितांची भर , 1 रुग्णांचा मृत्यू

  


किनवट : किनवटमध्ये शुक्रवारी ( ता.18) सायंकाळी 20.46 वाजता प्राप्त माहितीनुसार रॅपिड ऍटिजेन टेस्ट द्वारे  21 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  त्यामुळे आता  बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 438  झाली आहे. आज 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 183 व्यक्तींना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी सुटी दिली आहे. बाधितांपैकी येथील कोविड केअर सेंटरमध्ये 80 रुग्ण उपचार घेत आहेत 173 जण होम क्वारंटाईन आहेत.  

              आजच्या अहवालात किनवटच्या एस.व्ही.एम. कॉलनी येथील 1, गोकुंदा येथील 1, इस्लापूर येथील 4, दिगडी येथील 1, डोंगरगाव तांडा येथील 14 अशा 21 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अंबाडी येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

               डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 32, कोविड केअर सेंटर, किनवट येथे 48 व होम क्वारंटाईन 173 अशा एकूण 215 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.


किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे

ता. 18/09/2020 सायंकाळी 20.46 वाजता


आरटीपीसीआर टेस्ट

घेतलेले एकूण स्वॅब- 629,

निगेटिव्ह स्वॅब- 530,

आज आरटीपीसीआर स्वॅब पॉझिटिव्ह  संख्या- 0,

स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 0,

स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7, 


ऍन्टिजेन टेस्ट

ऍन्टिजन टेस्ट -70,

आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या -21,

निगेटिव्ह अहवाल -49,


आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण -21,


आज मृत्यू -1,

आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या-14,

आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती -438, 

आज सुटी दिलेले- 0,

रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या-183,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-80 (173 होम क्वारंटाईन  )

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News