*थोर समाजसुधारक व आध्यात्मिक मार्गदर्शक हरपले!* *संत, तपस्वी डॉ. रामरावजी महाराज यांना अशोक चव्हाण यांची श्रद्धांजली* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, October 31, 2020

*थोर समाजसुधारक व आध्यात्मिक मार्गदर्शक हरपले!* *संत, तपस्वी डॉ. रामरावजी महाराज यांना अशोक चव्हाण यांची श्रद्धांजली*


मुंबई, दि. ३१ ऑक्टोबर २०२०: बंजारा समाजाचे धर्मगुरू, पोहरादेवी संस्थानचे प्रमुख, बालब्रह्मचारी, संत, तपस्वी डॉ. रामरावजी महाराज यांच्या निधनामुळे थोर समाजसुधारक आणि आध्यात्मिक मार्गदर्शक हरपल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.


डॉ. रामरावजी महाराज यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांचे लाखो अनुयायी असून, ते बंजारा समाजाचे शक्तिस्थान होते. त्यांच्या निधनामुळे आज प्रत्येक वाडी-तांड्यावर शोककळा पसरली आहे. संत सेवालाल महाराज यांचा वारसा त्यांनी समर्थपणे चालवला होता. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, महिला अत्याचार, हुंडाबळी, अनिष्ट प्रथा व रूढींचे उच्चाटन आदींबाबत त्यांनी जनजागरणाचे मोठे कार्य केले. वाडी-तांड्यावर राहणाऱ्या बंजारा समाजाची प्रगती करायची असेल तर समाज शिक्षित झाला पाहिजे, त्यांच्यावर नव्या विचारांचे संस्कार झाले पाहिजे, ही भूमिका मांडून त्यांनी शिक्षणाचा प्रचार-प्रसार केला व बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले. त्यांचे कार्य केवळ बंजारा समाजापुरते मर्यादित नव्हते; तर इतर समाजांसाठीही ते प्रेरणास्थान होते.  


डॉ. रामरावजी महाराज यांचे चव्हाण कुटुंबाशी डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या काळापासून जिव्हाळ्याचे नाते होते. ते आमचे मार्गदर्शक होते व त्यांचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी होता. त्यांच्या दर्शनानंतर नेहमी एका वेगळ्याच समाधानाची अनुभूति होत असे. त्यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे, या शब्दांत अशोक चव्हाण यांनी डॉ. रामराव महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली. 



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News