किनवट : शनिवार ता. 31 ऑक्टोबर 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार आज 20 व्यक्तींची एँटिजेन तपासणी केली. त्यात एस. व्ही.एम . कॉलनी किनवट 1 व कोसमेट येथील 1 असे स्कूण 2 बाधित आढळले. तर दोन कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुटी दिली आहे.
त्यामुळे आता बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 588 झाली आहे. आजपर्यंत 507 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत.
बाधितांपैकी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 2, कोविड केअर सेंटर, किनवट येथे 0 व होम क्वारंटाईन 26 अशा एकूण 28 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. अब्दुल नासीर अब्दुल बारी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.
किनवटतालुका कोरोना संक्षिप्त अहवाल
आरटीपीसीआर टेस्ट
आजपर्यंत घेतलेले एकूण स्वॅब- 757,
आजपर्यंतचे निगेटिव्ह स्वॅब-634,
आज घेतलेले स्वॅब - 0,
आज आरटीपीसीआर पॉझिटिव्ह संख्या-0,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 0,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7,
ऍन्टिजेन टेस्ट
ऍन्टिजन टेस्ट-20,
आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या-2,
निगेटिव्ह अहवाल-18,
आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण-2,
आज मृत्यू - 0,
आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या-15,
आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती -588,
आज सुटी दिलेले-2,
रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या- 507,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 ( 26 होम क्वारंटाईन)




No comments:
Post a Comment