किनवट : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी कोविड केअर सेंटरची निर्मिती केली होती. त्यात सेवारत आरोग्य सेविकांनी जीवाची बाजी लावून सेवा बजावली होती. परंतु आता कोरोना नियंत्रणात येत असल्याने कमी रुग्णसंख्या असलेले कोविड केअर सेंटर बंद केले जात आहे. यात कार्य करणाऱ्या एएनएम व जीएनएम यांना कार्यमुक्त केले जात आहे. परंतु यांनी दिलेल्या प्रमाणिक सेवेचे महत्त्व विचारात घेऊन त्यांना कंत्राटी तत्वावर आरोग्य सेवेत सामावून घेण्याची मागणी एका पत्रकाद्वारे किनवट मतदार संघाचे आमदार भीमराव केराम यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जिल्हा व प्रमुख शहरांसह तालुक्याच्या ठिकाणी कोविड केअर सेंटरची निर्मिती केली होती. त्यात खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या आरोग्य सेविका जसे एएनएम व जीएनएम यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता निसंकोच सेवा दिली आहे. आजाराचा प्रादुर्भाव कमी होत होऊन रुग्ण संख्या ही कमी होत आल्याने शासनाने कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एएनएम व जीएनएम यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे. संकट समयी सेवा देणाऱ्या व कोरोना काळात आरोग्य सेवेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या आरोग्य सेविकांना एका आदेशात बेरोजगार केले जाणार आहे. एएनएम व जीएनएम यांनीआमदार भीमराव केराम यांना कंत्राटी तत्वावर आरोग्य सेवेत समावून घेण्याच्या मागणीचे साकडे घातले होते. या बाबीची व त्यांनी दिलेल्या सेवेचे महत्त्व अनन्याधारण असून त्यांच्या रास्त मागणीसाठी आमदार भीमराव केराम यांनी पुढाकार घेतला असून दिनांक ३१ रोजी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठवून कोरोना काळात कोविड केअर सेंटरमध्ये सेवा देणाऱ्या आरोग्य सेविका यांना ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कंत्राटी तत्वावर सेवेत समावून घेण्याची मागणी केली आहे. शिवाय या विषयी येत्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडणार असल्याचेही त्यांनी बोलतांना सांगितले.




No comments:
Post a Comment