जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंजी येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रा. डॉ. रवींद्र जोशी यांच्या "दृष्टिकोन " या पुस्तकाचे वाटप - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, November 23, 2020

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंजी येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रा. डॉ. रवींद्र जोशी यांच्या "दृष्टिकोन " या पुस्तकाचे वाटप

 



किनवट (नांदेड ) : सोमवार ( दि. 23 नोव्हेंबर ) रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंजी येथे गावातील होतकरू व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रा.डॉ. रवींद्र जोशी यांच्या "दृष्टिकोन" या पुस्तकाचे केंद्रीय मुख्याध्यापक  राजेश्वर जोशी यांच्या प्रेरणेतून  वाटप करण्यात आले.

        प्रा.डॉ. रवींद्र जोशी हे (एस. जी. जी . एस. ) अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था, नांदेड येथे डीन या पदावर कार्यरत असून त्यांना पंचवीस व वर्षाहून अधिक काळ शिक्षण आणि संशोधनाचा अनुभव आहे. त्या अनुभवाचा फायदा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घेता यावा या दृष्टीने सदर पुस्तकाचे लेखन करण्यात आले आहे. पंचायत समिती किनवट चे गटशिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांनी ग्रामीण भागातून 100 (आयएएस) भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी घडवण्याचे व्हिजन ठेवले असून त्याबाबीच्या पूर्णत्वासाठी " दृष्टिकोन " हे पुस्तक त्यासाठी खूप लाभदायक आहे.

            सदर पुस्तकांचे वाटप करताना सरपंच रेणुकाबाई रणमले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चरणसिंग चायल,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंजी येथील मुख्याध्यापक रवींद्र चौधरी, सह शिक्षक शशिकांत कांबळे, ग्रामसेवक पिराजी झटकवडे, पोलीस पाटील धर्मसिंग चायल,  रुखमाबाई चायल, उमनबाई कराळे, मारोती रणमले, उत्तम जंगले, भगवान कांबळे, दीपक कराळे, साहेबराव शेळके, संतोष साखरे यांच्या हस्ते सदानंद पिठलेवड, शिलरत्न भगत, शुभम भगत, प्रणिता भगत, मीरा पुसाम, युवराज रणमले, गजानन मुकडे, संतोष जंगले, आकाश चिबडे, एशवर्या रणमले यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News