नांदेड : नांदेड जिल्हा परिषदेतील प्रतिभासंपन्न शिक्षक, कवि, गायक, गितकार, उत्तम बासरी वादक, सहकारी चळवळीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागरी पतसंस्थेचे संकल्पक तथा इंडियन बहुजन टीचर्स असोसिएश (इब्टा) महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे प्रारंभीक जिल्हा संघटक गणपत गायकवाड यांच्या इसाप प्रकाशन,नांदेड यांनी प्रकाशित केलेल्या "वेदना-संवेदना" या द्वितीय काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रेडीट को. ऑप. सोसायटी लि.जिल्हा नांदेडच्या राज कॉर्नर,नांदेड येथील जिल्हा कार्यालयात थाटात संपन्न झाले.
प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शिक्षणक्षेत्रातील अभ्यासक तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,परभणीचे ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रा.डॉ.प्रविणकुमार पाईकराव हे होते. यावेळी आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार,विद्रोही कवि, तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,नांदेडचे ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रा.डॉ.अतुलकुमार चंद्रमोरे यांच्या हस्ते सदरील काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. प्रकाशन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी पतसंस्था लि.जिल्हा नांदेडच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन (इब्टा) महाराष्ट्र राज्य शिक्षक व कर्मचारी संघटनेचे केंद्रीय नांदेड जिल्हाध्यक्ष बालासाहेब लोणे, टी.व्ही.पत्रकार सदाशिव गच्चे, जिपहा माळकौठा ता.मुदखेड शाळेचे अराजपत्रित मुख्याध्यापक तथा इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन (इब्टा)चे केंद्रीय नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष बबनराव घोडगे, सरचिटणीस प्रकाश नांगरे, समता पतसंस्थेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक तथा इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन (इब्टा) महाराष्ट्र राज्य शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या पदोन्नत मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष रमेश गोवंदे, सरचिटणीस कुमारस्वामी माने, इब्टाचे जिल्हा उपाध्यक्ष माधव कांबळे, हदगाव तालुकाध्यक्ष शेख अब्दूल नसिर उपस्थित होते.
यावेळी "वेदना-संवेदना " काव्यसंग्रहाचे कवि गणपत गायकवाड यांनी काव्यसंग्रहाच्या निर्मितीची भूमिका मांडली. "वेदना-संवेदना " या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करतांना प्रा.डॉ.अतुलकुमार चंद्रमोरे म्हणाले की, "गणपत गायकवाड यांच्या संपूर्ण कवितासंग्रहाला बुध्द-आंबेडकरी तत्वज्ञानाचा पाया असून बुध्द-आंबेडकरी तत्वज्ञानाचा प्रसार, प्रचाराचे प्रामाणिक प्रयत्न करणारांना त्यांची कविता प्रेरणा देते. "वेदना-संवेदना " हा काव्यसंग्रह सर्व समाज घटकांचे जीवनदर्शन घडवित परिवर्तनाचा संदेशही देते, " असे ही ते म्हणाले.
यावेळी बालासाहेब लोणे आपल्या मनोगतात असे म्हणाल की, "गणपत गायकवाड हे कलासक्त संवेदनशिल कवि मनाचेच साहित्यिक आहेत. त्यांच्या 'माझ्या पवित्र देशा' नंतर या दुसऱ्या काव्यसंग्रहास माझ्यासह सर्व सहकारी मित्रांकडून खूप खूप सदिच्छा. "
अध्यक्षीय समारोप करताना प्रा.डॉ.प्रविणकुमार पाईकराव म्हणाले की, "कवि, लेखक व विचारवंत हे आंबेडकरी चळवळीचे नावाडी आहेत. एकवेळेस सर्व सामान्य माणसांकडून झालेली चूक दुरुस्त करता येईल परंतू साहित्यिक, विचारवंतानी कळत नकळत केलेल्या चुकांचे परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागतात. कवि गणपत गायकवाड यांचा "वेदना-संवेदना " हा काव्यसंग्रह बुध्द-आंबेडकरी तत्त्वज्ञानावर 100 % खरा उतरतो. ग्रामिण, शहरी, वाडी-तांडयावरच्या लोकांचे जगणे मांडत या सर्व वंचितांना दिशा दाखविण्याचे कार्य हा काव्यसंग्रह करतो, " अशा शब्दात त्यांनी या काव्यसंग्रहाचा गौरव केला.
प्रकाशन सोहळ्याचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन इब्टाचे सरचिटणीस निलेश गोधने यांनी केले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागनाथ येरमलवाड, वसंत मोरे,शेख अहेमद,अर्धापूर तालुका शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष तथा इब्टाचे अर्धापूर तालुकाध्यक्ष मिलिंद राऊत, नांदेड तालुकाध्यक्ष विजय इंदूरकर, मुदखेड तालुकाध्यक्ष उध्दव मुंगरे, सोनबा दवणे, रामदास गोणारकर, राम अनंतवार, प्रा.मांजरमकर, डोंगरे, बळीराम कदम, जितेंद्र गवळे, माधव अंभोरे, तुकाराम वाठोरे, लक्ष्मण वानखेडे, अशोक पंडीत, मिलिंद दरबारे, कैलास पोहरे, जगन्नाथ दिंडे, नामदेव मुंडे, बळीराम कसबे, कैलास धुतराज, सुभाष सावते, बी.जी. बुकटे, गुलाब जावळे, साहेबराव कांबळे, साहेबराव डोंगरे, मिलिंद जाधव, दत्ता नरवाडे, एम.पी.(मिठू) लोणे, किरणकुमार एडके, दत्ता ढवळे, भारत नहारे, प्रकाश चंद्रे, यशवंत हनमंते, कपिल पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.




No comments:
Post a Comment