...वसंतात हेमंत पोहचले अतिदूर्गम जगदंबातांड्यावर... - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, February 24, 2021

...वसंतात हेमंत पोहचले अतिदूर्गम जगदंबातांड्यावर...

 




किनवट : तालुका मुख्यालयापासून अकरा किलोमीटर अंतरावर ढग्यामाळावर वसलेल्या, ना रस्ता, ना पाणी, शिक्षणाशिवाय इतर कोणतीही योजना न पोहचलेल्या अतिदुर्गम डोंगरी जगदंबातांड्यावर थोडं पायी, थोडं दुचाकी अशी पायपीट करत रखरखते ऊन अन् पळसफुलांनी बहरलेल्या वसंतात खासदार हेमंत पोहचल्याने आता या दुर्लक्षित तांड्यावर विकासाचा बहार येणार असल्याची आशेची किरणं भोळ्या-भाबड्या नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटून दिसत होती.

            रस्त्याअभावी तातडीने उपचार न मिळाल्याने नवजात अर्भक दगावलेल्या कुटूंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी नुकतीच येथे भेट दिली.


रस्त्याअभावी गर्भवती महिलेच्या अर्भकाला गमवावा लागला प्राण ; माता सुखरूप 


किनवट तालुक्यातील अंबाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या जगदंबातांडा येथे अर्भकाला आपले प्राण गमवावे लागल्याची हृदयद्रावक घटना नुकतीच घडली असून माता सुखरूप आहे.

        डोंगर माथ्यावरील अतिदुर्गम जगदंबातांडा या वस्तीला पक्का रस्ताच नाही. मोठे वाहन जात नाही. दुचाकी वाहन कसेबसे जाते. दीड-दोन किलोमीटर अंतराचा घाट रस्ता पायपीट करून किंवा मोठ्या त्रासाने दुचाकीवरून मुख्य रस्त्यावर येऊन त्यानंतर एखाद्या वाहनाने तालुका मुख्यालय किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जावे लागते. बुधवार (दि. १७ फेब्रुवारी) रोजी  अनिता राहुल राठोड या गर्भवती महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. तेंव्हा दवाखान्यात आणण्यासाठी रस्त्या अभावी पायीच चालवत न्यावे लागले. घाट कसा बसा उतरला आणि गर्भवती महिलेच्या गर्भाशयातील नवजात अर्भकाचा एक पाय बाहेर निघालेल्या अवस्थेत गोकुंदा येथील उप जिल्हा रुग्णालयात सकाळी 10. 20 वाजता दाखल करण्यात आले. इथे नैसर्गिक प्रसूती शक्य नसल्याने डॉ. आर. जी. बोडके यांनी त्या महिलेला 10.30 वाजता म्हणजे अवघ्या दहा मिनिटात आदिलाबादला रेफर केले. तिथे उपचाराअंती अर्भकाला पोटातच जीव गमवावा लागला माता मात्र सुखरूप आहे.

 

  

खासदार हेमंत पाटील सोमवारी सकाळी पोहचले दुचाकीने जगदंबातांड्याला 



        किनवटला मुक्कामी असलेल्या  खासदार हेमंत पाटील यांना मॉर्निंग वॉक करतांना जगदंबातांड्याची घटना कळली. वर्गमित्र प्रा. सुरेश कटकमवार व शिवसैनिक श्रिनिवास कनपेल्लीवार यांना सोबत घेऊन घाट रस्त्याने मोटरसायकलवर ते तांड्यात दाखल झाले. अत्यंत साधा पेहराव, भगवे वस्त्र घालून असल्याने गावकऱ्यांना वाटले कोणीतरी दीक्षाधारी असावेत. त्यांनी गावकऱ्यांना सोबत घेऊन फोटो काढला व शाळेच्या कामाला भेट दिली. गावकरी म्हणाले, "साहेब चहा पिऊन जा."  तेव्हा खासदार महोदय उत्तरले,"रस्त्याचं काम सुरू झाल्यानंतरच आपल्या तांड्यात येऊन चहा घेतो, मला ओळखलं काय ? मी आपला खासदार हेमंत भाऊ आहे !" ... आता मात्र जगदंबातांडावासीय एकदम अवाक झाले ! आजतागायत कोणी अधिकारी वा पदाधिकारी न आलेल्या गावात सूर्योदया बरोबर खासदार आल्याने... वसंतात हेमंत आले असेच म्हणावे लागेल.



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News