किनवट : तहसिलला लागून असलेल्या तेलंगणातील आदिलाबाद येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात मराठी भाषा लोककल्याण समितीच्या वतीने रविवार (दि.28 फेब्रुवारी ) रोजी भाईचारा बहुभाषिक कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ कवी, साहित्यिक, प्रवक्ते तथा संमेलनाध्यक्ष मधु बावलकर यांनी दिली.
मराठी भाषीक जनकल्याण समितीच्या वतीने देशातील महान व्यक्ती, गुरु रविदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज, संत गाडगे बाबा, माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त रविवार (दि. 28 सकाळी 11.00 वाजता आदिलाबाद जिल्हा परिषदेच्या सभागृहात भाईचारा बहुभाषिक कविसंमेलनाचे आयोजित करण्यात आले आहे.
संमेलनाचे उद्घाटन आदिलाबादचे खासदार सोयाम बापूराव यांचे हस्ते होणार असून जन आरोग्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मराठी भाषीक जनकल्याण समितीचे जिल्हाध्यक्ष अभियंता तथा अभिवक्ता ऍड. राठोड सुभाष नायक हे स्वागताध्यक्ष आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष जनार्दन राठोड, आमदार जोगू रामन्ना, बापूराव राठोड, पंडितराव चव्हाण (विचारवंत, नांदेड), आदिलाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किसन श्रृंगारे, जिल्हा ग्रंथालय संघाचे चेअरमन मनोहर राऊत, माजी नगराध्यक्ष दिगांबर पाटील, उद्योजक बजरंगलाल अग्रवाल, मराठा समाज अध्यक्ष नारायण चोपडे, डॉ. संजय गव्हाळे, राजू रामेकर, शिवाजी डावळे, बापुराव डोके, संदेश भारद्वज, मोहनराव ताथोडे, गंभीर ठाकरे, रवींद्र राऊत व जैनतचे उपसभापती विजय साबापुरे हे उपस्थित राहतील.
या कविसंमेलनात प्रशांत वंजारे (यवतमाळ), डॉ. चंद्रप्रकाश देगलूरकर (नांदेड), रमेशबाबू वाघमारे (पारवा), सुधाकर डोंगरे ( यवतमाळ), डॉ.उदारी नारायण (आदिलाबाद), चंद्रकांत कदम (भोकर), शंकर कारम,जी.आर. कुर्मे (आंतरराष्ट्रीय कवी), डॉ.एम.ए.खदीर, कमलाकर दिलेर (भैंसा), रामजी कांबळे, प्रा. गजानन सोनोने,प्रा.डॉ. अंबादास कांबळे, रमेश मुनेश्वर, अशोक वासाटे, सुरेश शेंडे प्रा.डॉ.आनंद भालेराव, प्रा. डॉ.पंजाब शेरे, राजेश पाटील (किनवट), मेकाला मल्लन्ना, गणेश मेकाणे (आदिलाबाद) जनार्दन कांबळे (उदगीर), अशोक भगत (वणी), दत्तू शिंदे, महेश लेकरिया (आदिलाबाद) गाजी बद्रोद्दीन बदर, शाख अन्वर (आदिलाबाद), भूमन्ना तोटापल्ली (मंचेरियल) ), महानंद भारती , माधव वाघमारे (आदिलाबाद) हे कवि आपल्या रचना सादर करतील. कवि गोपाल नादान मिश्रा व उत्तम कानिंदे हे सूत्रसंचालन करतील.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे अनिल साळवे, दुधागिरी थोरात, रवींद्र ताथोडे, गंगाधरी गंगन्ना, तुकाराम जीवने, पुंडलिक सर्पे, शत्रुघ्न जीवने, रघुनाथ इटकरे, सुकुमार पेटकुले, तुकड्यादास गेडाम, रामसिंग ठाकूर, विष्णू मुकाडे, बालाशंकर कृष्णा आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.




No comments:
Post a Comment