नांदेडमध्ये २७ फेब्रुवारीला गज़लकार इलाही जमादार अभिवादन कार्यक्रम - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, February 26, 2021

नांदेडमध्ये २७ फेब्रुवारीला गज़लकार इलाही जमादार अभिवादन कार्यक्रम

 



नांदेड : सुप्रसिद्ध गज़लकार इलाही जमादार यांना नांदेड येथे शनिवार (दिनांक २७ फेब्रुवारी ) रोजी नांदेडकरांच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पूर्णा रोडवरील नागोराव नरवाडे मंगल कार्यालयामध्ये संध्याकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कवीश्रेष्ठ इलाही जमादार स्मृती समारोह समिती नांदेडतर्फे या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

 मराठी, हिंदी आणि उर्दू भाषेत दर्जेदार गज़ल लेखन करणारे कवीश्रेष्ठ इलाही जमादार यांचे गेल्या ३१ जानेवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. नांदेडकरांच्यावतीने या कार्यक्रमात इलाही जमादार यांच्या गज़ल, गायन, वाचन आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देणा-या मनोगतांमधून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मंत्रालयातील अवर सचिव विकास तु. कदम, गज़लकार व्यंकटेश कुलकर्णी (हैद्राबाद), गज़लकार विमल मुदाळे (लातूर), डॉ. अरुण साबळे (शिर्डी), मेगेश रुपटक्के (पुणे), अशोक डोंगरे (माजलगाव) या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

 अभिवादन कार्यक्रमात नांदेड शहरातील गायक, कलावंत इलाही जमादार यांच्या विविध रचना सादर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी कवीश्रेष्ठ इलाही जमादार स्मृती समारोह समितीचे प्रा. विकास कदम, डॉ. राजेंद्र गोणारकर, माया भद्रे, बापू दासरी सदाशिव गच्चे, ऍड. साहेबराव शेळके, राम चव्हाण, बी.के. कांबळे, रोहित शास्त्री अडकटलवार, अरुण फाजगे, दिपक नरवाडे, प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार, डॉ. कैलास धुळे, पत्रकार प्रविण खंदारे, प्रा. जगदीश केंद्रे, ऍड. नागराज मांजरमकर, इंजि. सम्राट हटकर, मानव कुंडलवाडीकर, शंकर नरवाडे, मिलिंद ढवळे, बाबूराव पाटील, यशवंत कदम, लक्ष्मी लहाने, अविनाश नाईक, नामदेव इंगळे, अविनाश भुताळे, डॉ. राजेंद्र लोणे आदींनी पुढाकार घेतला आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News