मुंबई ( सुषेण नरे ): राज्यातील अनेक ठिकाणी लसी केंद्रावर लस संपल्यामुळे अनेक नागरिकांना परत जावे लागत आहे. यामुळे मुंबईसारख्या शहरांमध्ये उद्रेक होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे अधिक लक्ष व लस पुरवठा करण्यासाठी विनंती केली आहे. यामुळेच राज्य केंद्र सरकार यामध्ये वेगळा लशी संघर्ष निर्माण झाला आहे.
जनतेच्या मत या नेत्यांनी राजकारण न करता लवकरात लवकर कोरोनावर मात कशी करता येईल यासाठी एकत्र येणे फार गरज आहे असे मत व्यक्त केले आहे. राज्यातील अनेक लसीकरण केंद्रावर लस संपल्याचे फलक लावल्यामुळे नागरीक नाराज झाले आहेत एकीकडे सरकार लसीकरण करण्यासाठी जाहिरात करत आहे तर दुसरीकडे राज्यातील लस पुरवठा झाल्यामुळे अनेक नागरिकांना लस मिळण्यास अडचण निर्माण येत आहे. सोशल मीडिया वरती महाराष्ट्र राज्याला इतर राज्यापेक्षा केंद्राकडून लस पुरवठा कमी करण्यात येतो आणि हे जाणून बुजून केले जात आहे केंद्र सरकार राज्याला विनाकारण त्रास देतात अशा प्रकारचे मेसेज पसरत आहेत तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी राज्य सरकारचे नियोजन नाही अशी आवई उठवत आहे राज्यात लसच नव्हे तर ऑक्सिजन व कोरोनाच्यासाठी प्रचलित असलेले रेमेडेसिव्हिर या इंजेक्शनची कमतरता आहे. रूग्णालयात बेड नाहीत. व्हेंटिलेटर्सची उपलब्धता नाही अशी माहिती तर दुसरीकडे लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती असतानाही बाजारपेठेत लोकांची गर्दी दिसून येत आहे. चेहर्यावर अर्धवट मास्क किंवा विना मास्क लोक फिरत आहेत कोरोनाचे राज्य व केंद्र सरकारने घातलेले आरोग्य विषयक नियम केंद्र आहेत ते पायदळी तुडवले जात आहेत.
यामुळे कोरोनाच्या संसर्गावर मात कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. गर्दी रोखण्यासाठी आता रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट देणे बंद केले आहे लांब पल्ल्यांच्या गाडी साठी जाणाऱ्या सीएसटी, एलटीटी, कल्याण, पनवेल, दादर या ठिकाणी प्लॅटफॉर्म तिकीट देणे बंद केल्यामुळे गर्दीवर नियंत्रण करण्यात यश येईल असे वाटते तर मुंबईकडून उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश बिहार व कानपूर या ठिकाणी जाणार्या गाड्यांना भरपूर गर्दी आहे. अनेक परराज्यातील कामगार मुंबई शहर सोडून आपल्या गावाकडे जात आहेत.




No comments:
Post a Comment