*574 कोरोना बाधित झाले बरे* ▪️नांदेड जिल्ह्यात 163 व्यक्ती कोरोना बाधित ▪️8 जणांचा मागील दोन दिवसांत मृत्यू - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, May 18, 2021

*574 कोरोना बाधित झाले बरे* ▪️नांदेड जिल्ह्यात 163 व्यक्ती कोरोना बाधित ▪️8 जणांचा मागील दोन दिवसांत मृत्यू


नांदेड (जिमाका) दि. 18 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 169 अहवालापैकी 163 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 110 तर अँटिजेन तपासणीद्वारे 53 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 87 हजार 266 एवढी झाली असून यातील 82 हजार 492 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 2 हजार 560 रुग्ण उपचार घेत असून 111 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 17 व 18 मे 2021 या दोन दिवसांच्या कालावधीत 8 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 824 एवढी झाली आहे. दिनांक 17 मे 2021 रोजी तिरुमला कोविड रुग्णालयात जैन मंदिर नांदेड येथील 61 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे देगलूर तालुक्यातील जारी येथील 67 वर्षाचा पुरुष, लोहा तालुक्यातील मारतळा येथील 53 वर्षाचा पुरुष, कंधार येथील 58 वर्षाची महिला तर 18 मे रोजी मुखेड कोविड रुग्णालयात मुखेड तालुक्यातील बेळी येथील 45 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे आनंदनगर येथील 42 वर्षाची महिला, हर्षनगर नांदेड येथील 75 वर्षाचा पुरुष, गांधीनगर बिलोली येथील 81 वर्षाच्या पुरुषाचा यात समावेश आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 41, देगलूर 3, कंधार 3, मुखेड 7, हिंगोली 2, नांदेड ग्रामीण 3, धर्माबाद 10, किनवट 1, नायगाव 7, यवतमाळ 5, भोकर 4, हदगाव 4, लोहा 2, वाशिम 1, बिलोली 8, हिमायतनगर 2, मुदखेड 5, परभणी 2 बाधित आढळले तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 9, देगलूर 3, कंधार 2, मुखेड 6, अर्धापूर 1, धर्माबाद 2, किनवट 4, नायगाव 5, भोकर 1, हदगाव 2, माहूर 10, परभणी 1, बिलोली 3, हिमायतनगर 1, मुखेड 3 असे एकूण 163 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 574 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 14, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण व जंम्बो कोविड सेंटर 301, मुखेड कोविड रुग्णालय 15, धर्माबाद तालुक्यातंर्गत 6, अर्धापूर तालुक्यातंर्गत 5,कंधार तालुक्यांतर्गत 5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 11, बारड कोविड केअर सेंटर 9, मुदखेड कोविड केअर सेंटर 12, माहूर तालुक्यांतर्गत 2, बिलोली तालुक्यांतर्गत 35, उमरी तालुक्यांतर्गत 3, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 6, देगलूर कोविड रुग्णालय 3, हिमायतनगर तालुक्यातंर्गत 19, हदगाव 10, लोहा तालुक्यांतर्गत 12, खाजगी रुग्णालय 106 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 2 हजार 560 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 83, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 54, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 56, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 10, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 37, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 24, देगलूर कोविड रुग्णालय 6, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 25, बिलोली कोविड केअर सेंटर 48, नायगाव कोविड केअर सेंटर 11, उमरी कोविड केअर सेंटर 12, माहूर कोविड केअर सेंटर 13, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 17, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 17, धर्माबाद कोविड केअर सेंटर 26, मुदखेड कोविड केअर सेंटर 10, अर्धापूर कोविड केअर सेंटर 9, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 8, एनआरआय कोविड केअर सेंटर 3, बारड कोविड केअर सेंटर 11, मांडवी कोविड केअर सेंटर 1, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 3, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 7, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 420, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 1 हजार 185, खाजगी रुग्णालय 464 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 72, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 73, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 89, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 32 खाटा उपलब्ध आहेत.

 

*जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती*.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 1 हजार 926

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 4 हजार 321

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 87 हजार 266

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 82 हजार 492

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 824

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.52 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-12

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-12

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-236

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 560

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-111.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News