*खावटी अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, May 18, 2021

*खावटी अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन*

 








नांदेड (जिमाका)  :- आदिवासी समाजातील गरजू कुटूंबाना आर्थिक सहाय्य करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने खावटी अनुदान योजना पुन्हा नव्याने कार्यान्वित केली आहे. या योजनेसाठी पूर्वी अर्ज न भरलेल्या तसेच अटी व निकषात बसणाऱ्या पात्र आदिवासी समाजातील कुटुंबानी नवीन अर्ज भरावेत.  नवीन अर्ज संबंधीत कार्यक्षेत्रातील मुख्याध्यापक शासकीय, अनुदानित आश्रमशाळा यांच्याकडे उपलब्ध होतील. लाभार्थ्यांनी अर्जासोबत आधारकार्ड झेरॉक्स प्रत, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुकचे झेरॉक्स किंवा पोस्टाचे पासबुकचे झेरॉक्स, उपविभागीय अधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र झेरॉक्स प्रत इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण एच.पुजार यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News