१० वीचा निकाल १६ जुलै , २०२१ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर होणार -शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, July 15, 2021

१० वीचा निकाल १६ जुलै , २०२१ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर होणार -शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड

 


मुंंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ , पुणे -०४  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ .१० वी ) परीक्षा सन २०२१ चा निकाल दि. १६ जुलै , २०२१ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर होणार असल्याचे महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले. 

           महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ .१० वी ) लेखी परीक्षा दि .२ ९ / ०४ / २०२१ ते दि .२० / ०५ / २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती . परंतु कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने  दिनांक १२ मे , २०२१ च्या शासन निर्णयनुसार परीक्षा रद्द करण्यात आली .   दिनांक २८ मे , २०२१ च्या शासन निर्णय नुसार इ .१० वीसाठी मूल्यमापन कार्यपध्दती जाहीर केली. त्यानुसार दि .१० जून , २०२१ रोजी मूल्यमापन कार्यपध्दतीबाबत शिक्षकांचे प्रशिक्षण व वेबिनार घेण्यात आला. दि .२३ जून , २०२१ ते दि .०२ जुलै , २०२१ दरम्यान सुचित केल्याप्रमाणे माध्यमिक शाळांनी संगणक प्रणालीमध्ये गुण नोंदविले. 

         सन २०२१ च्या इ .१० वी ची एकूण प्रविष्ट विद्यार्थी संख्या मुले- ९ , ० ९ , ९ ३१ मुली -७,४८,६ ९ ३ एकूण- १६,५८,६२४  एकूण आठ माध्यमानुसार विद्यार्थी प्रविष्ट झाली होती. राज्य मंडळ स्तरावर दि .०३ जुलै २०२१ ते दि .१५ जुलै , २०२१ अखेर मंडळामार्फत निकाल तयार करण्याची कार्यवाही करण्यात आली . त्यानुसार दि .१६ जुलै , २०२१ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन पध्दतीने निकाल जाहीर होणार आहे . अशी माहिती महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.

*दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार*

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळामार्फत सन 2021 मध्ये इयत्ता दहावी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल शुक्रवार 16 जुलै 2021 रोजी दुपारी 1 वा. ऑनलाईन जाहीर होणार आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे. मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार http://reshul.mh-ssc.ac.in तसेच www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होणार आहे.

 

सन 2021 मध्ये इयत्ता 10 परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्याने मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार इयत्ता 9 वीचा अंतिम निकाल, इयत्ता 10 वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन इत्यादीच्या आधारे माध्यमिक शाळांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहेत. त्यानुसार मंडळाने विहित कार्यपद्धतीनुसार या परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केली आहे.

 

शासन निर्णय 28 मे 2021 मधील तरतुदीनुसार सन 2021 मधील दहावी परीक्षेस श्रेणीसुधार योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. या विद्यार्थ्यांना पुढील एक / दोन संधी उपलब्ध राहतील असेही शिक्षण मंडळाने प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News