महात्‍मा गांधी आणि लालबहादूर शास्‍त्री यांची जयंती साजरी करून मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली स्‍वच्‍छतेची शपथ - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Saturday, October 2, 2021

महात्‍मा गांधी आणि लालबहादूर शास्‍त्री यांची जयंती साजरी करून मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली स्‍वच्‍छतेची शपथ
नांदेड : नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी आणि लालबहादूर शास्‍त्री यांची जयंती आज साजरी करण्‍यात आली. महात्‍मा गांधी व लालबहादू शास्‍त्री यांच्‍या प्रतिमेस मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्‍या हस्‍ते पुष्‍पहार अर्पण करुन अभिवादन करण्‍यात आले. यावेळी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. सु‍धिर ठोंबरे, जिल्‍हा पाणी व स्‍वच्‍छता मिशनचे प्रकल्‍प संचालक व्‍ही.आर. पाटील, महिला व बाल कल्‍याण विभागाच्‍या उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, जिल्‍हा नेहरु युवा केंद्राच्‍या जिल्‍हा समन्‍वयक चंदा रावळकर, उप शिक्षणाधिकारी माधव सलगर, उप शिक्षणाधिकारी बंडू अमदूरकर, कार्यकारी अभियंता ओमप्रकाश निला, जिल्‍हा कार्यक्रम व्‍यवस्‍थापक मिलिंद व्‍यवहारे, जयश्री खंदारे, पाणी व स्‍वच्‍छता मिशनचे लेखाधिकारी कुरे अदींची उपस्थिती होती.


     भारताच्‍या 75 व्‍या स्‍वातंत्र्यदिनाच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षानिमित्‍त देशभरात विविध उपक्रम घेण्‍यात येत आहेत. यातंर्गत स्‍वच्‍छता ही सेवा पंधरवड्याचा आज समारोप करण्‍यात आला. त्‍यानिमित्‍त जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी उपस्थितांना स्‍वच्‍छतेची शपथ दिली. यावेळी नेहरु युवा केंद्राच्‍या वतीने काढण्‍यात आलेल्‍या पाणी व स्‍वच्‍छता फलकाचे विमोचनही त्‍यांनी केले. या प्रसंगी अभय  नलावडे, महेंद्र वाठोरे, नंदलाल लोकडे, विशाल कदम, चैतन्‍य तांदुळवाडीकर, सुशील मानवतकर, कपेंद्र देसाई, कृष्‍णा गोपीवार, मुक्रम शेख, विठ्ठल चिगळे तसेच जिल्‍हा परिषदेचे अधिकार व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

स्वच्छता शपथ- स्वच्छतेतूनच गावात समृद्धी येण्यासाठी मी माझे गाव अधिक स्वच्छ, सुंदर ठेवेन. उघड्यावर कुठे घाण होऊ देणार नाही. सांडपाण्याचे आणि घनकच-याचे वैयक्तिक स्तरावर व्यवस्थापन करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेल आणि सर्वांना तसे करण्यासाठी प्रवृत्त करेन. मी, ओला कचरा आणि सुका कचरा यांचे घरातच विलगीकरण करेन आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावीन. मी, प्लास्टिक मुक्तीसाठी सदैव तत्पर राहीन. वापरा आणि फेका प्रकारच्या प्लॅस्टिकच्या वस्तू आणि थैल्या वापरणार नाही. मी अशी शपथ घेतो की, माझे घर आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी माझी आहे. ती मी पार पडेन आणि इतरांनाही यासाठी प्रवृत्त करेन. स्वच्छतेच्या कार्यात मी सदैव योगदान देऊन गाव हागणदारीमुक्त अधिक बनवण्यासाठी आणि त्यात स्वच्छतेचे सातत्य कायम राखण्यासाठी मोलाचे सहकार्य करेन.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News