किनवट : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त लाल बहादूर शास्री व महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी सकाळी 11 वाजता माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये तालुका विधी सेवा समिती च्यावतीने मौजे घोटी येथे आयोजिलेले कायदेविषयक शिबिर उत्साहात संपन्न झाले.
तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश एस. बी . अंभोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तर सह दिवाणी न्यायाधीश परवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विधी सेवा समितीचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष के. मूर्ती मंचावर उपस्थित होते.
ऍड. दिलीप काळे यांनी प्रस्ताविकातून पवित्र साध्य मिळवायचे असेल तर साधनही तसेच पवित्र असायला पाहिजे ही बाब विशद केली. त्यानंतर ऍड. विलास सूर्यवंशी (शामिले) यांनी "शेतकऱ्यांसाठीचे महसुली कायदे" , ऍड. दिव्या पाटील -सर्पे यांनी " महिलांचे कायदे " व सहदिवाणी नायाधीश परवरे यांनी "ग्राम राज्य " याविषयावर मार्गदर्शन केले. दिवाणी न्यायाधीश अंभोरे यांनी "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" या विषयावर विचार व्यक्त करून अध्यक्षीय समारोप केला.
याप्रसंगी ऍड. मिलिंद सर्पे, ऍड. राहूल सोनकांबळे, ऍड. सुनिल येरेकार, ऍड. टेकसिंघ चव्हाण, न्यायालयीन वरिष्ठ लिपिक एल. वाय. मिसलवार, न्यायालयीन सेवक जुबेर खान पठाण, पोलीस कर्मचारी पठाण, परमेश्वर गाडेकर, बोंडलेवाड, ग्राम विस्तार अधिकारी प्रशासक घुमटकर, ग्रामसेवक अंभोरे, तलाठी पांढरे, संगणक चालक गौतम भवरे, माजी सरपंच वचना सातपुते, गावातील प्रतिष्ठित नागरिक आनंदराव सुरोशे, जगदीश गोविंदराव गरड (पाटील), राजू सुरोशे, देवरथ मुनेश्वर, गणपत पाटील, सिद्धार्थ भवरे, रामदास प्रधान, पांडुरंग खरे, अभिजीत गरड, चंद्रशेखर गरड, सतीश गरड, किशोर चटलेवार, मारुती रमेश गरड, प्रभाकर मगर, ग्रामपंचायत सेवक गंगाधर बेंद्रे, पाणीपुरवठा कर्मचारी कैलास पावडे, पंचायत समितीचे वाहन चालक उत्तम कागणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कायदेविषयक शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
No comments:
Post a Comment