नांदेड : भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या (अमृतमहोत्सवी वर्ष ) निमित्त जिल्ह्यात स्वच्छतेचे विविध उपक्रम सुरू आहेत. दिनांक 15 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या स्वच्छता ही सेवा या पंधरवड्याचा समारोप शनिवार ( दिनांक 2 ऑक्टोबर ) रोजी स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त गावा-गावातून स्वच्छतेची शपथ घेऊन स्वच्छतेसाठी श्रमदान करण्यात आले. या उपक्रमात ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
स्वच्छता ही सेवा पंधरवाडयानिमित्त स्वच्छतेचे उपक्रम राबविण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलेल्या आवाहनला प्रतिसाद देत गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक व ग्रामस्थांनी योग्य नियोजन व स्वच्छतेचे विविध उपक्रम राबवून हा पंधवरवडा यशस्वी केला आहे.
आज जिल्हयातील अनेक गावातून प्लास्टिक कचरा, ओला व सुका कचरा एकत्र करण्यात आला. कुटुंब स्तरावर कचरा वर्गीकरण करणे, वापरा व फेका प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू, थैल्या न वापरणे, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी वैयक्तिक व सार्वजनीक ठिकाणी शोषखड्डयांची कामे करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे.
*जिल्हयातील अनेक गावातून ग्रामसफाई*
दिनांक 2 ऑक्टोबर हा दिवस जिल्हयात स्वच्छ भारत दिवस म्हणून जिल्हाभर साजरा करण्यात आला. या उपक्रमातून गावस्तरावर ग्रामसफाई करुन गाव स्वच्छ करण्यात आले. तसेच गावे हागणदारीमुक्त अधिक करुन गावात कायम स्वच्छता राखली जाणार आहे. यानिमत्त हदगाव तालुक्यातील वाळकी बु येथे स्वच्छतेची शपथ घेवून स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. ग्रामसेवक एस.एस. सारंग, तलाठी चंदनकर, अंगणवाडी कार्यकर्ती ए.बी. काळबांडे, मंदाताई सावते यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
निवळा ग्रामपंचातीमध्ये ग्रामसेवक बी.आर. तावडे यांच्या उपस्थितीत स्वच्छतेची शपथ घेतली. रोहिपीपळगाव येथे महात्मा गांधी जयंती निमित स्वच्छता आभियान राबविण्यात आले. धर्माबाद तालुक्यातील दगडवाडी येथे प्लास्टिक कचरा संकलन करण्यात आले. मुदखेड तालुक्यातील रोहीपिंपळगावसह जिल्हयातील 1 हजार 310 ग्रामपंचायतीमधून आज स्वच्छ भारत दिवस साजरा करुन ग्रामसफाईचा एकत्रिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमला ग्रामस्थांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
No comments:
Post a Comment