पुणे : येत्या ४ ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्या आरोग्य, सुरक्षासंबंधीत पूर्वतयारीबाबत आज शनिवार (दि. 02 रोजी शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. आरोग्यदायी वातावरणात शाळा उघडण्याविषयी मौल्यवान सूचना यावेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केल्या.
याप्रसंगी विभागातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांसोबत राज्यभरातील विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राचार्य (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था), शिक्षणाधिकारी, (प्राथमिक व माध्यमिक), शिक्षण निरीक्षक, प्रशासन अधिकारी (महानगरपालिका) व गटशिक्षणाधिकारी उपस्थितत होते .
Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) Tweeted:
येत्या ४ ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्या आरोग्य, सुरक्षासंबंधीत पूर्वतयारीबाबत आज शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला.आरोग्यदायी वातावरणात शाळा उघडण्याविषयी मौल्यवान सूचना यावेळी केल्या गेल्या https://t.co/DmdZ1UAPYz https://twitter.com/VarshaEGaikwad/status/1444255660519088129?s=20
आपल्या शाळा अनुकूल वातावरणात सुरू व्हाव्यात, यासाठी @scertmaha
ने कृती आराखडा आखला आहे, त्याचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश याप्रसंगी दिले आहेत. तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शाळेत प्रत्यक्ष भेट देऊन पूर्वतयारीबाबत व एकूणच परिस्थितीवर देखरेख ठेवण्याबाबत सूचना दिल्या.
विद्यार्थ्यांना शाळेत पोषक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यासाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर शिक्षण विभाग, आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासन समन्वय साधतील.
राज्यातील काही भागांत तब्बल दीड वर्षांनंतर शाळा सुरक्षितपणे पुन्हा सुरू होत आहेत. त्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षणाचा उत्सव होऊन विद्यार्थ्यांचे स्वागत व्हायला हवे, याबाबत आवश्यक त्या सूचनाही यावेळी शिक्षणमंत्री प्रा. गायकवाडी यांनी केल्या.
No comments:
Post a Comment