त्रुटीतील व नवे वनहक्क दावे एका महिन्यात पुराव्यासह दाखल करावे -सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, May 5, 2022

त्रुटीतील व नवे वनहक्क दावे एका महिन्यात पुराव्यासह दाखल करावे -सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार

  



किनवट : किनवट व माहूर तालुक्यातील सर्व दावेदारास व ग्रामवनहक्क समीतीस अंतीम व शेवटची सूचना  देण्यात येते की , त्रुटीतील वैयक्तीक व सामुहिक वनहक्क दावे परीपूर्ण करून एका महिन्यात सादर करावेत तसेच पुरेसे सबळ व ठोस पुरावे त्या त्या विभागाकडून प्रमाणीत करुनच वंशावळ सिध्द करणाऱ्या पुराव्यासह नव्याने दावे दाखल करावे , असे किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कीर्तिकरण एच. पुजार (भाप्रसे) यांनी प्रगटनाद्वारे  जाहिर   केले आहे .

          याबाबत सविस्तर वृत्त असे की , उपविभागस्तरीय वनहक्क समीती किनवट अंतर्गत माहूर व किनवट तालूक्यातील दावेदारांनी दाखल केलेल्या वैयक्तीक वनहक्क दाव्यावर कार्यवाही करण्यास्तव उपविभागीय अधिकारी किनवट यांनी समीतीवरील शासकीय व अशासकीय सदस्यांना ता.. २२/०४/२०२२ रोजीचे पत्रान्वये ता. २६/०४/२०२२ नूसार सकाळी ११.०० वा . बैठक आयोजीत केल्याबाबत अवगत केले . त्यानूसार ता . २६/०४/२०२२ रोजी आयोजीत बैठकीस किर्तीकिरण एच . पुजार ( भा.प्र.से. ) सहाय्यक जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष , उ.वि. स्त.किनवट , जी.डी.गिरी सहाय्यक वनसंरक्षक ( ज.का.स. ) किनवट , सौ . सुरेखा सुभाष वानोळे ( अशासकीय सदस्या.उ . वि . स्त . समीती ) तसेच रेणुका जितेंद्र कांबळे ( अशासकीय सदस्या , उ . वि . स्त . समीती ) आणि वनहक्क संकलनात कार्यरत कर्मचारी ( तालुका मॅनेजर महेश राठोड ) उपस्थित होते . 

        सदर बैठकीत एकूण २६६ प्रकरणे कार्यवाहीस्तव ठेवण्यात आलीत , ज्यामध्ये फेरचौकशी अंतर्गत १९९ , मुळ दावे ४१ त्रुटी पुर्ततेतील २६ प्रकरणांवर तपशिलवार चर्चा करण्यात आली . चर्चेअंती सौ . सुरेखा सुभाष वानोळे ( अशासकीय सदस्या , उ . वि . स्त . समीती ) यांनी फेरचौकशीतील प्रलंबीत असलेल्या दाव्यांमध्ये दावेदारास त्रुटी पुर्ण करण्यासाठी आणखी वेळ देण्याबाबतची सुचनेस उपस्थित सदस्यांनी एकमताने संमती दिल्यानूसार अध्यक्षांनी ती मान्य करुन दाव्यातील त्रुटी पुर्ण करण्यासाठी १ महीन्याच्या कालावधी वाढवून दिला , मात्र तत्पुर्वी याबाबत जाहीर प्रगटन देवून त्यानंतर अंतीम कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिलेत . उपविभागस्तरीय वनहक्क समीतीकडे ग्राम वनहक्क समीतीकडून दाखल होणारी वैयक्तीक व सामुहिक वनहक्क दावे परिपूर्ण दाखल होत नसल्याने समीतीकडे दावे प्रलंबीत राहत असून दावे अपूर्ण असल्यास ती ग्राम वनहक्क समीतीकडे परत करण्याची सूचना सौ . सुरेखा सुभाष वानोळे ( अशासकीय सदस्या , उ . वि . स्त . समीती ) तसेच रेणुका जितेंद्र कांबळे ( अशासकीय सदस्या , उ . वि . स्त . समीती ) यांनी संयुक्तपणे सुचना मांडली त्यास एकमताने उपस्थितांनी मान्य केली त्यानुसार ३८ दावे परत करण्यात आलीत . 

          ● अध्यक्षांनी जिल्हास्तरीय समीतीकडे जी दावे पात्र करुन पाठविण्यात आली त्यामध्ये संबंधीत दावेदारास डिसेंबर २०२१ मध्ये पत्र देवून त्रुटी पुर्ण करण्याबाबत कळविले , मात्र दावेदाराने याबाबत त्रुटी पुर्तता करण्याचे स्वारस्य न दाखवील्याने सदर दावे अपात्र करण्याबाबत सूचना केली . यावर सर्वांनी सहमती दर्शविली . सर्व दावेदारास व ग्रामवनहक्क समीतीस अंतीम व शेवटची सूचना देण्यात येते की , त्यांनी विहीत कालावधीत दावे परीपूर्ण करून सादर करावेत . नव्याने दावे दाखल करावयाचे असल्यास त्यासोबत पुरेसे सबळ व ठोस पुरावे त्या त्या विभागाकडून प्रमाणीत करुनच वंशावळ सिध्द करणाऱ्या पुराव्यासह सादर करावेत असे समस्त जनास जाहिर करण्यात येते . असे किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कीर्तिकरण एच. पुजार (भाप्रसे) यांनी आपल्या स्वाक्षरीसह काढलेल्या जाहीर प्रगटनाद्वारे आवाहन केले आहे. 




No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News