किनवट : येथील बळीराम पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शनिवार (ता. २१ मे २०२२ ) रोजी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डॉ.जी.एस.वानखेड़े होते. दहशतवाद हिंसाचार या गंभीर प्रश्नावर विद्यार्थ्यांना रासेयो कार्यक्रम आधिकारी प्रा. शेषराव माने यांनी मार्गदर्शन केले, सूत्रसंचालन केले व दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त शपथ देण्यात दिली.
याप्रसंगी प्रा.एम.एस.राठोड, रासेयो सल्लागार प्रा.डॉ. पंजाब शेरे, प्रा. डॉ. शुभांगी दिवे, डॉ. प्रज्ञा घोडवाडीकर, प्रा.प्रल्हाद जाधव, प्रा.गंगाधर राहुलवाड, प्रा.सतिश मिराशे, सम्राट पाटील, आकाश मांजरमकर, साक्षी मिसलवार इ.उपस्थित होते.




No comments:
Post a Comment