शिष्यवृत्ती परीक्षा आता ता. ३१ जुलै रोजी घेण्यात येणार ; पूर्वीचेच प्रवेशपत्र ग्राह्य - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, July 14, 2022

शिष्यवृत्ती परीक्षा आता ता. ३१ जुलै रोजी घेण्यात येणार ; पूर्वीचेच प्रवेशपत्र ग्राह्य

 

पुणे : सद्यस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पुरसदृश्य स्थिती लक्षात घेता ता. २० जुलै रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा आता ता.३१ जुलै रोजी घेण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी जाहीर केले .

         याबाबत सविस्तर वृत्त असे की , महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत घेण्यात येणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ . ५ वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ . ८ वी ) ही ता . २० जुलै २०२२ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असलेबाबत जाहिर करण्यात आले होते. तथापि सद्यस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पुरसदृश्य स्थिती व बहुतांश ठिकाणी भुस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी तसेच विद्यार्थी हित व त्यांची सुरक्षा लक्षात घेता सदर परीक्षा ता. २० जुलै २०२२ ऐवजी रविवार ता . ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात येईल. ता.१४ जुलै २०२२ रोजी  यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र ता. ३१ जुलै २०२२ च्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येतील.  याची नोंद राज्यातील सर्व संबंधितांनी घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News