मागासवर्गीयांसह इतर संवर्गातील मुलींनाही आता नोकरी करत शिकण्याची संधी : 27 सप्टेंबरला गोकुंद्यात व 28 ला नांदेडात निवड चाचणी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, September 21, 2022

मागासवर्गीयांसह इतर संवर्गातील मुलींनाही आता नोकरी करत शिकण्याची संधी : 27 सप्टेंबरला गोकुंद्यात व 28 ला नांदेडात निवड चाचणी

 


किनवट (नांदेड) : आदिवासी मुलींना प्रकल्पाधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार(भाप्रसे) यांनी नोकरी करत शिकण्याची संधी उपलब्ध करून दिल्याचे शिबीर यशस्वी झाल्याने आता जिल्ह्यातील सर्वच मागासवर्गीय व इतर संवर्गातील मुलींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व त्यांचे शिक्षणही पूर्ण व्हावे यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट व कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग नांदेड व समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त व  टाटा ईलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि. होसुर यांचे संयुक्त विद्यमाने निवड चाचणी अर्थात रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

             मंगळवार तारीख 27 सप्टेंबर रोजी माहूर, किनवट आणि हिमायतनगर तालुक्यातील मुलींसाठी महात्मा ज्योतीबा फुले कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा ( किनवट ) येथे सकाळी 9 वाजता मेळावा होईल.  बुधवार 28 सप्टेंबर रोजी नांदेड येथे यशवंत महाविद्यालय, बाबानगर येथे सकाळी 10 वाजता भर्ती शिबीर (रोजगार मेळाव्याचे ) आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात जिल्हयातील 18 ते 21 वयाच्या एस.सी.,एस.टी. , व्हि.जे. , एन.टी. , ओबीसी , एस. बी. सी. व इतर संवर्गातील 'बेरोजगार युवतींनी वेळेवर उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार यांनी केले आहे. 

      या मेळाव्यामध्ये टाटा ईलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि.कंपनीच्यावतीने तीन चाचण्या व मुलाखती घेण्यात येणार आहेत. यासाठी किमान शैक्षणिक पात्रता 12 वी किंवा कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक (02462)-251674 किंवा ई-मेल आयडी nandedrojgar@gmail.com वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

         येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्यावतीने टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने 12 वी उत्तीर्ण आदिवासी विद्यार्थिनींना ज्युनिअर टेक्निशियन या पदावर नोकरी करत आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मागील वर्षी 150 मुलींची निवड केली होती. यातील 80 मुलींनी बेंगलूरू व चेन्नई येथे प्रशिक्षण घेतले. त्यापैकी सुमारे 50 मुली आज टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड होसूर येथे कार्य करीत आहेत. तसेच 6 व 7 सप्टेंबरला महात्मा ज्योतीबा फुले कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा ( किनवट ) येथे घेण्यात आलेल्या निवड चाचणी शिबिरात 410 मुलींची निवड झाली आहे.

         12 वी विज्ञान, कला व वाणिज्य उत्तीर्ण 18 ते 21  वयोगटातील मागासवर्गीयांसह इतर संवर्गातील मुलींना   ज्यूनियर टेक्निशियन या पदावर कार्य करीत बी.एस्.सी. ( मॅन्युफॅक्चरींग सायंस ) ही पदवी मिळविण्याची संधी व त्यानंतर प्रमोशन होऊन कंपनीत उच्च पदावर कार्य करण्याची संधी पुन्हा एकदा  उपलब्ध करून दिली आहे.

         मंगळवारी (ता. 27 सप्टेंबर ) सकाळी 9 वाजता माहूर , किनवट व हिमायतनगर तालुक्यातील मुलींसाठी महात्मा ज्योतीबा फुले कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा ( किनवट ) येथे व बुधवारी (ता. 28 सप्टेंबर ) सकाळी 10 वाजता नांदेड जिल्ह्यातील मुलींची निवड चाचणी यशवंत महाविद्यालय, बाबानगर, नांदेड येथे होणार आहे. तेव्हा कोणत्याही शाखेतून  बारावी उत्तीर्ण झालेल्या 18 ते 21 वर्षे वयोगटातील मुलींनी गुणपत्रिका , टी.सी., आधार कार्ड व जातीचे प्रमाण पत्र ह्या प्रमाण पत्रांच्या स्वयंसाक्षांकित सत्यप्रतीसह ( झेरॉक्स प्रती ) उपस्थित रहावे, असे आवाहन प्रकल्पाधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार (भाप्रसे) यांनी केले आहे.

        याविषयी अधिक माहितीसाठी शंकर साबरे ( समन्वयक तथा नियोजन अधिकारी 9404490023 ), सुनिल पाईकराव ( समन्वयक तथा लेखा अधिकारी 9545746111 / 8999 053538 ),  नितीन जाधव ( समन्वयक तथा स.प्र.अ.शि. 8208117747 / 9527105559 ) , मनोज टिळे ( समन्वयक तथा स.प्र.अ.शि. 9420040734 ) , आनंद मेथे ( वरीष्ठ लिपीक 9970952623 / 8275624397 ), नागनाथ चटलेवाड ( 9921100591 ), मिलिंद मुंडे ( 8149953067 ) , सुनिल कासरेकर (9946532058 ) यांचेशी संपर्क साधावा असेही कळविले आहे.

         महात्मा ज्योतीबा फुले कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा ( किनवट ) येथील भरती शिबीराचे नियोजन मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभियंता प्रशांत ठमके यांनी केले आहे.



        

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News