संविधान जनजागरण रॅलीने नांदेडकरांना पटविले संविधानाचे महत्व - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, November 14, 2022

संविधान जनजागरण रॅलीने नांदेडकरांना पटविले संविधानाचे महत्व

 



नांदेड : क्रांतिभूमी महाड ते दीक्षाभूमी नागपूर जाणारी संविधान जनजागरण रॅली नांदेड जिल्ह्यात प्रविष्ठ झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व छत्रपती शिवराय पुतळा येथे अभिवादन करून पदयात्रा काढून व जयभीमनगर येथील बुद्धविहारात धम्म व संविधान या विषयाचे महत्व पटविले दिले.
         जीवन मुक्ती सोशल फाउंडेशन पुणे यांच्या वतीने क्रांतीभूमी महाड ते दीक्षाभूमी नागरपूर या मार्गाने भारतीय संविधान जनजागरण प्रचार रॅली
आयोजित केली आहे. औरंगाबाद येथील संविधान विश्लेषक अनंत भवरे, दादासाहेब कांबळे, आसाराम गायकवाड, सुरज वाळके, अरुण शिंदे, दीपक लोखंडे हे कार्यकर्ते संविधानातील अनुच्छेदाचे विश्लेषण करून त्याचे महत्व जनतेला पटवून देत आहेत.



        ही रॅली नांदेडात आल्या नंतर सार्वजनिक बांधकाम विभागचि सेवानिवृत्त अभियंता भरतकुमार कानिंदे, संविधानाचे गाढे अभ्यासक डॉ. अनंत राऊत, वसंत वीर , टी. पी. वाघमारे, आर. सी. कांबळे, अरुण केसराळीकर, बार्टीच्या नांदेड प्रकल्प अधिकारी  सुजाताताई पोहरे, हिरामण भगत, दयानंद तारू, विनोद पाचंगे, ज्योतीताई जाधव, अमित कांबळे, राणीताई बंडेवार, भीमदास पाटील, शंकर कावळे, भीमराव मुनेश्वर, सुमनबाई पाटील आदींसह अनेक मान्यवरांनी रॅलीचे स्वागत केले.
               प्रथमत: राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले स्मारक त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
         त्याच ठिकाणी संविधानाचे महत्व आणि काही अनुच्छेदाचे विश्लेषण करून त्याचे महत्व जनतेला पटवून देण्यात आले.
डॉ. बाबासाहेबांनी कोणत्याही काळातील सर्व प्रकारच्या समस्येचं निराकरण संविधानात कसे करून ठेवले आहे याचे विश्लेषण औरंगाबाद येथील संविधान विश्लेषक अनंत भवरे  यांनी सांगितले. त्यानंतर तिथून रे छत्रपती शिवराय यांच्या स्मारकापर्यंत पदयात्रा काढण्यात आली.
यावेळी रस्त्याने सुद्धा या देशातील नालायक राज्यकर्त्यांनी संविधानाची पायमल्ली
गेल्या 72 वर्षात कशी केली याची सविस्तर मांडणी करून घोषणा दिल्या.
       यावेळी प्रा. डॉ. अनंत राऊत सर यांनी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले तसेच प्रकल्प अधिकारी पोहरेताई ,अभि.भरतकुमार कानिंदे, भीमराव मुनेश्वर , उत्तम कानिंदे ,  आदिंनी आपले मनोगत व्यक्त करून रॅलीला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
            त्यानंतर सायंकाळी 7 वाजता जयभिम नगर येथील बुद्धविहारात धम्म आणि संविधान या विषयावर सखोल मंथन करुन उपस्थितांना जागृत करून मतदानाविषयीं शपथ देण्यात आली आणि परभणी येथील पुढील प्रवासासाठी रॅली मार्गस्थ झाली...

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News