मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षा निमित्य आयोजित भाषण स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे -गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, November 14, 2022

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षा निमित्य आयोजित भाषण स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे -गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने

 



किनवट : जिल्हा परिषद नांदेडच्या नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षा निमित्य तालुक्यात आयोजित भाषण स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी केले आहे.
       जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून मराडवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षा निमित्य नांदेड जिल्हा परिषदेव्दारे नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. यानुषंगाने मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांचे कार्य व त्यांच्या आंदोलनाची गाथा घराघरांत पोहचविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये बोलण्याचे धाडस, आत्मविश्वास, विद्यार्थ्यांच्या भाषण कौशल्यांचा विकास, विषय प्रतिपादन, हावभाव इत्यादी कौशल्य आत्मसात व्हावेत. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन प्राप्त व्हावे, यासाठी शाळा, केंद्र, बीट व तालुकास्तरीय 'भाषण स्पर्धा' आयोजित करण्यात येत आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. सविता बिरगे व शिक्षणाधिकारी ( माध्यमिक) प्रशांत दिग्रसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती अंतर्गत सर्व शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांच्या सहकार्याने तालुक्यातील जिल्हा परिषद, शासकिय, खासगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित प्राथमिक व माध्यमिक शाळा व आश्रम शाळा अशा सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व प्रकारच्या  शाळांतील विद्यार्थ्यांसाठी सदर भाषण स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
          इयत्ता 1 लो ते 6 वी व 7 वी ते 10 वी अशा दोन गटात ह्या स्पर्धा होणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे मराठवाडा मुक्ती संग्राम आंदोलनातील योगदान हा भाषण स्पर्धेचा विषय आहे.
      मंगळवारी (ता.15) शाळास्तर, गुरुवारी (ता. 17 ) केंद्रस्तर , शनिवारी (ता.19) बीटस्तर मंगळवारी (ता.22) हुतात्मा जयवंतराव पाटील स्मारक, ईस्लापूर येथे तालुकास्तरीय स्पर्धा होतील. शाळास्तरावर प्रत्येक गटातून प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी केंद्रस्तरावर ,केंद्रस्तरावरील प्रथम क्रमांकाचा स्पर्धक बीट स्तरावर व बीटस्तरावील प्रथम क्रमांकाचा यशवंत तालुकास्तरावर स्पर्धेत सहभागी होईल. सर्धेनंतर यशवंतांना बक्षिस देण्यात येईल.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News