शिवणकामगार आईच्या लेकीची न्यारी बात , घरीच अभ्यास करून नीटवर केली मात ; डॉक्टर व्हायला हवी आर्थिक मदतीची साथ - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Monday, January 2, 2023

शिवणकामगार आईच्या लेकीची न्यारी बात , घरीच अभ्यास करून नीटवर केली मात ; डॉक्टर व्हायला हवी आर्थिक मदतीची साथ

 किनवट : येथून जवळच असलेल्या गोकुंदा येथील राजर्षी शाहू नगरात राहणाऱ्या शिवणकाम करणाऱ्या आईच्या कर्तबगार जिद्दी लेकीने घरीच अभ्यास करून नीट परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविला. परंतु तिला आता डॉक्टर होण्यासाठी आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे.

          मराठवाड्यातील किनवट माहेर असलेल्या यशोधराचा विदर्भातील सोनखास येथील डोमाजी देवतळे यांचेशी विवाह झाला. त्यांना मुलगा (योगेश ) व मुलगी (ऋतुजा ) असे दोन अपत्ये झाली. जेमतेम आर्थिक स्थिती असल्याने आईच्या मदतीने संसार थाटण्यास हे कुटूंब किनवटला आले. डोमाजी भाजीपाला विकून कुटूंबाला सावरू लागले. 

        मुलगा योगेश महात्मा ज्योतीबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा येथूनच 10 वी परिक्षेत 95 % पेक्षा अधिक गुण घेऊन तालुक्यातून प्रथम आला. पुढील शिक्षण मी नांदेडलाच घेईन असा त्याने आग्रह धरला.  हालाकिची आर्थिक स्थिती असल्यामुळे आपणास ते झेपणार नाही असे वडील डोमाजी म्हणाले. परंतु मुलाचा हट्ट कायमच. यातूनच त्याच्या आई वडिलांत वाद झाला. वडील विभक्त झाले. परंतु अशाही स्थितीत आई यशोधरा डगमगली नाही. शिवणकाम करून तिने मुलाला चांगलं शिक्षण द्यायचं ठरवलं. त्याला नांदेडला ठेवलं. परंतु त्याला पैसे पुरवता पुरवता तिची ससेहोलपट झाली. नीटची तयारी करतांना आर्थिक विवंचनेमुळे त्याच्यावर भयंकर ताण आला. त्यात डॉक्टरांनी त्यास सहा महिने निव्वळ विश्रांतीचा सल्ला दिला. 

        त्यानंतर तो घरीच राहीला. पुन्हा फिनिक्स प्रमाणे त्याने उभारी घेतली. 12 वीतही तो तालुक्यातून प्रथम आला. नीटमध्येही त्याला चांगले मार्क्स मिळाले. पहिल्याच यादीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याचा प्रवेश निश्चित झाला. परंतु तो तिथेही जायला तयार नव्हता. मला कला शाखेतून पदवी घ्यायची आहे. युपीएस परीक्षा देऊन मला आय.ए.एस. व्हायचं आहे ! असा त्याचा हट्ट. तेव्हा त्याला अनेकांनी समजावलं. युपीएस परीक्षा देऊन यशस्वी होण्याची गॅरंटी नसते. परंतु एम. बी. बी. एस. करून नोकरी किंवा खासगी प्रॅक्टीस करून आईला आधार देता येईल. हे त्याला पटलं मग त्याने औरंगाबादला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. यावेळीही त्याच्या आईला त्याच्या मेसचा व इतर खर्च पुरवायला मोठ्या खस्त्या खाव्या लागल्या. त्याच्या वर्गमित्रांनी त्याला यावेळी आधार दिला.

        इकडे यशोधरा अंगणवाडी सेविका असलेल्या आईच्या आधाराने शिवणकाम करून पै-पै जोडत होती. सुई दोरा हाती घेऊन मुलाच्या हाती औषधाची सुई देण्याची अपेक्षा बाळगत होती. तिची आई आजारी पडली. तिची दिव्यांग मावशी तिलाही अर्धांगवायूचा अटॅक आला. हे सगळं करतांना पुण्यात असलेली बहीणही लेकरू घेऊन हिच्यापाशीच आली. अशा सर्वांचा सांभाळ ही लेडीज टेलर यशोधरा करू लागली. अशातच टाळेबंदीच्या स्थितीत मोठा आधार असलेली आई गेली. तेव्हा मात्र तिला खूप धक्का बसला. कसेबसे सावरत मुलासह मुलगी ऋतुजाचही शिक्षण पूर्ण करण्यास तिला तारेवरची कसरत करावी लागत होती. 

            मुलगी ऋतुजा महात्मा ज्योतीबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा येथे शिकत होती. तिने आईची घालमेल पाहिली. शिवणकाम करून दादाचे एम.बी.बी.एस. पूर्ण करण्यासाठीची आईची प्रचंड कष्ट उपसण्याची धडपड तिने जवळून पाहिली होती. त्यामुळे तिनेही मनाशी ठरवून टाकलं. आपणही भावासारखच डॉक्टर व्हायचं. परंतु याकरिता आता कोणताही नीटचा क्लास लावण्यासाठी आईला त्रास द्यायचा नाही. स्वतःच्या घरीच अभ्यास करायचा.  भावाच्या मार्गदर्शना खाली जिद्दीने तिने स्वयंअध्ययनाने नीट परिक्षेत चांगले मार्क्स मिळविले. पहिल्या यादीत तिला कोकणातील एका सेमी गर्व्हमेंट कॉलेजला प्रवेश मिळाला होता. वर्षाला दिड लाखाचा खर्च करणे तिच्या अवाक्याबाहेरचं होतं. त्यामुळे तिने दुसऱ्या फेरीची वाट पहिली. त्यात तिला उस्मानाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. शिवणकाम करणाऱ्या आईच्या कर्तबगार जिद्दी लेकीने घरीच अभ्यास करून नीट परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविला खरा. परंतु तिला आता डॉक्टर होण्यासाठी आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. या भरीव पाठबळावरच पतीनंतर एकटीने दोन्ही मुलं डॉक्टर करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या सवित्रीची लेक असलेल्या असहाय्य यशोधरेचं स्वप्न साकार होणार आहे.

यासाठी पुढील बँक खात्यात जमेल तशी मदत करावी.


Rutuja Domaji Devtale 

A/C 33317902202

IFSC SBIN0020057

STATE BANK OF INDIA

BRANCH  KINWAT


Phone Pe No. 8308485725


     


  

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News