'ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ' जयंतीनिमित्त गोकुंद्यात प्रबोधन व्याख्यान, एकपात्री अभिनय व डॉक्टरकी पूर्ण केलेल्या सावित्रींच्या लेकिंच्या सत्काराचे आयोजन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, January 2, 2023

'ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ' जयंतीनिमित्त गोकुंद्यात प्रबोधन व्याख्यान, एकपात्री अभिनय व डॉक्टरकी पूर्ण केलेल्या सावित्रींच्या लेकिंच्या सत्काराचे आयोजन



किनवट :  'सावित्रीमाई फुले' यांच्या 192 व्या जयंतीनिमित्त प्रबोधन विचारमंच किनवट द्वारा आयोजित प्रबोधन व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी (ता. 03 जानेवारी 2023 ) सायंकाळी 7:00 वाजता तक्षशीला बुद्धविहार विद्यानगर गोकुंदा येथे करण्यात आले आहे.

        सदरील कार्यक्रमाच्याअध्यक्षा तहसीलदार  डॉ.मृणाल जाधव, स्वागताध्यक्ष सत्यशोधक विचारवंत प्रा.रामप्रसाद तौर तर भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभि.प्रशांत ठमके यांची विशेष उपस्थिती राहणार असून प्रमुख व्याख्यात्या म्हणून सावित्रीमाई फुले विचारमंच किनवटच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके ह्या काळाच्या पुढे धावणारी स्त्री : ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले या विषयावर विचारांची पेरणी करणार आहेत.          

          सावित्रीमाई फुले जयंती तथा बालिकादिनाचे औचित्य साधुन जिद्द व चिकाटीने शिकून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या डॉ. स्वाती मिलिंद मुनेश्वर, डॉ.शालिनी भुजंगराव शेवाळे, डॉ. प्रतीक्षा प्रमोद स्थूल, डॉ.स्नेहल मनोहर सावळे आणि डॉ. स्नेहल विनय वैरागडे यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. तसेच कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण बिटरगाव येथील वंदना संभाजी वाघमारे ह्यांचा " होय, मी सावित्री बोलतेय!... " हा एकपात्री प्रयोग आयोजित केला आहे. 

        या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उत्तम कानिंदे करतील; तर माजी प्राचार्य राजाराम वाघमारे आभार मानतील. या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन  प्रबोधन विचारमंच किनवटचे अध्यक्ष राजा तामगाडगे, सचिव प्रा.अजय पाटील , कार्याध्यक्ष  भीमज्योत मुनेश्वर व संयोजन समितीतील प्रा.भीमराव घुले, लक्ष्मण भवरे, कपिलकुमार भवरे, प्रा. डॉ. कपिल पाटील, मुक्तीबोध पाटील, आनंद गिमेकर, विशाल गिमेकर, यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News