आमदारांना दरमहा 2 लाख 71 हजार 947 रुपये ; तर दिव्यांग- निराधारांची हजार - दीड हजारात बोळवण - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, March 11, 2023

आमदारांना दरमहा 2 लाख 71 हजार 947 रुपये ; तर दिव्यांग- निराधारांची हजार - दीड हजारात बोळवण

 


नांदेड : महाराष्ट्रतील आमदार भुकबळिने बळी जाऊ नये म्हणुन वेळेवर दिले जाते  दरमहा  महिन्याला 2 लाख 71 हजार 947 रुपये इतके वेतन दिले जाते ; तर दीनदुबळ्या (अति श्रीमंत ! ) दिव्यांग, वृध्द, निराधारांना दरमहा १ हजार रू ( बजेट मध्ये जाहीर केले दीड हजार )  मानधन चार-चार महिने मिळत नाही . तरीही ते भुकबळिने मरत नाहित अशी खंत दिव्यांग संघपनेचे अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी व्यक्त केली.

         महाराष्ट्रतील अति श्रीमंत अनेक व्यवसाय करुन बाहेर देशात रक्कम ठेवणारे दीनदुबळे  दिव्यांग, वृध्द,निराधार यांना दरमहा एक हजार (आता दीड ) रूपये वेतन दिले जाते. त्या अनुदानात दोन वेळा चहासाठी दुध तरी मिळते काय ? तेही दर महिन्याऐवजी तीन ते चार महिन्याला दिले जाते . कारण ते मतदार मालक अति श्रीमंत असल्यामुळे ते भुकबळिने बळी पडत नसल्यामुळे त्यांचे मानधन केंव्हाही दिले तरी चालते. त्यांच्या मानधनात वाढ नाही केली तरी चालते. कारण ते दीनदुबळे दिव्यांग, वृध्द, निराधार, कमकुवत असुन प्रत्येक निवडणुकित मतदानाच्या हक्काने आपल्या लाडक्या लोकप्रतिनिधींची निवड करतात.  त्यावेळी प्रतिनिधी अनेक अश्वासनं देतात . दिव्यांग कायदे करतात. परंतु त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणुन लोकप्रतिनिधी प्रयत्न करित नाहित . तेव्हा दिव्यांग, वृध्द,  निराधार पडत झडत आंदोलन करतात. पण एखादा बच्चु कडू सारखा आमदार अधिवेशनात प्रश्न मांडतो. बाकी आमदार, खासदारांना फक्त निवडणूकित मतदानासाठी आठवण येते.


     पण दिव्यांग कायदा करून किंव्हा आमदारांनी सभागृहात दिव्यांगाच्या विकासासाठी दरवर्षी पंधरा लाख रू त्यांच्या मतदार संघातील दिव्यांगाच्या वैयक्तिक विकासासाठी खर्च करण्याचे  पास करून ही ते मिळावे म्हणुन संघटनेच्या वतीने निवेदन देऊन , मोर्चे काढून सुध्दा ते आमदार दिव्यांग निधी देत नाहित.  दिव्यांग संघटनेच्या वतीने आपण लोकप्रतिनिधी या नात्याने सभागृहात लक्षवेधीने प्रश्न मांडण्यासाठी दिव्यांग, वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट् संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल हे  शिष्टमंडाळासहित दरवर्षि आमदार महोदयांना  निवेदन देऊन विंनती करतात. शासन प्रशासनास जागे करण्यासाठी अनेक निवेदने, धरणे, मोर्चे करुन ही या दीनदुबळ्या दिव्यांग, वृध्द निराधारांना न्याय मिळत नसल्याची खंत  त्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे व्यक्त  केली आहे.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News