घुंगराळा-तलबिड वनपर्यटनाच्या निधी तरतूदीसाठी वन विभागाचा हिरवा कंदील ! भाजपा नेते बालाजी बच्चेवार यांची यशस्वी मध्यस्थी ; सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार लक्ष्मणराव मा.भवरे यांचे आमरण उपोषण सुटले - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, March 12, 2023

घुंगराळा-तलबिड वनपर्यटनाच्या निधी तरतूदीसाठी वन विभागाचा हिरवा कंदील ! भाजपा नेते बालाजी बच्चेवार यांची यशस्वी मध्यस्थी ; सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार लक्ष्मणराव मा.भवरे यांचे आमरण उपोषण सुटले

 



नायगांव (बा.) (नांदेड) : गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घुंगराळा-तलबिड या वन /निसर्ग पर्यटनाच्या परिपूर्ण योग्यतेने विकास आराखडा बनविण्यासह त्यास मान्यता व निधीची तरतूद आणि उपलब्धतेसाठी वनविभागाकडून सकारात्मक भूमिकेचे आश्वासन मिळाल्याने सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार लक्ष्मणराव मा.भवरे यांनी थेट घुंगराळ्यातच सुरु केलेले आमरण उपोषण मागे घेतले. यासाठी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी यशस्वी मध्यस्थी केली.

            अधिक माहिती अशी की, नांदेड जिल्ह्याच्या पंचक्रोशीतील जागृत देवस्थान श्री.खंडोबा (श्री.म्हाळसाकांत) मंदिर घुंगराळा व जागृत देवस्थान श्री.महादेव मंदिर गंगणबिड (तलबिड) ता.नायगांव (खै.) जि.नांदेड या दोन्ही तिर्थक्षेत्र/तिर्थस्थळासाठी भरिव निधी द्यावा.सोबतच,येथे वन/निसर्ग पर्यटन केंद्राची मान्यता मिळाल्याने याबाबतचा तातडीने शासन निर्णय काढण्यात यावा. तसेच,या दोन्ही मंदिर परिसरातील वनजमिनींचे एकत्रित संपादन करुनच येथिल सर्वांगीण विकासासाठी तातडीने परिपूर्ण योग्यतेने विकास आराखडा बनवून त्यास मान्यता  देऊन शासनस्तरावरून भरिव निधीची तरतूद व उपलब्धतेसाठी महाराष्ट्र विधानमंडळाच्या सद्यास्थित चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच प्रयत्न व्हावेत म्हणून शासनाने लक्ष द्यावे यासाठी सातत्याने विनंती व पाठपुराव्यानंतरही कार्यवाही होत नसल्यानेच उपरोक्त मागणी मार्गी लावण्यासह शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जागृत देवस्थान श्री.खंडोबा(श्री.म्हाळसाकांत) मंदिराच्या पायथ्याशीच घुंगराळ्यात दिनांक ९ मार्च २०२३ रोजी मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न,नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष व राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मारोतीराव भवरे यांनी आमरण उपोषण सुरु केले होते.

        महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाच्या दिनांक २८ जुलै २०१७ रोजीच्या कार्यकारी समितीच्या सभेत घुंगराळा- तलबिड वन/निसर्ग पर्यटन केंद्राला मान्यता दिली.परंतू,यासाठी मागविण्यात आलेला विकास आराखडा अनेकदा त्रुटीत परत पाठविला असल्याने तो परिपूर्ण व योग्यतेने बनवून त्यास मान्यतेसह निधीची तरतूद आणि उपलब्धता करावी.तसे झाल्यास जेणेकरुन या वनक्षेत्रात वन्नोद्यान,कृषी तंत्रज्ञान अभ्यासिका,जलसिंचन,वृक्षलागवड व संगोपण,पशू-पक्षांसह पर्यटनादृष्टीने आवश्यक ती कामे व सोयी-सुविंधांची विविध कामे होऊन त्यातून परिसरातील सर्वांगीण विकास सोबतच, वनपर्यटनासह नव उद्योग वाढीसाठीही निश्चितच प्रयत्न होणार आहेत त्याच अपेक्षेत सामाजिक दायित्व म्हणून भवरे हे सन् २०११ पासून या प्रकरणात सातत्यपूर्ण प्रयत्न करित असून या प्रकरणात राज्याचे वनमंत्री  सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्याशी चर्चेनंतरच यापूर्वी मान्यता मिळाली होती.यापूढेही यासाठीची मान्यता व निधी तरतूदीसाठी आपण निश्चित प्रयत्नशील असल्याचे अभिवचन राज्याचे वनमंत्री श्री मुनगंटीवार,पालकमंत्री गिरीष महाजन व नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपणांस दिल्याचे भाजपा नेते बालाजी बच्चेवार यावेळी उपोषणस्थळी भेटीत म्हणाले सोबतच,त्यांच्याच माध्यमातून लवकरच यासाठी निधीची तरतूद,उपलब्धता होणार असल्याचे सांगून याबाबत त्यांनी वनविभागाकडून होत असलेल्या कार्यवाहीची माहिती नांदेडचे उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्याशी भवरे यांची चर्चा घडवून त्यांना अवगत करुन दिली आणि तसे पत्र देगलूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निखील हिवरे यांनी दिले.त्यानंतर, भवरे यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले.

       दरम्यान घुंगराळ्याच्या सरपंच श्रीमती राधाबाई जोगेवार,उपसरपंच व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे,बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे,काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष से.नि.प्राचार्य मनोहर पवार,रघुनाथ सोनकांबळे, काँग्रेसचे युवा नेते पंडित पाटील सुगावे,मोहन जोगेवार, बालाजी मातावाड,व्यकंटराव सुगावे,युवक काॅग्रेसचे देविदास पाटील सुगावे,भिमशक्तीचे भगवान भद्रे,नागोराव दंडेवाड,दत्ता पाटील मोरे, शिवाजी वडपत्रे,मा.उपसरपंच शिवाजीपाटील ढगे,वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष दीपक गजभारे,तुळशीराम कळकटवाड,शेख चाँदपाशा,बालाजी हाळदेवाड, शेख सलीम,पत्रकार यशवंत थोरात,किरण वाघमारे,रामराव ढगे, प्रकाश महिपाळे,भगवान शेवाळे,सहदेव तुरटवाड,अंकुश देगांवकर आदींसह घुंगराळा- तलबिड परिसरातील नागरिक, पत्रकारांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठींबा दिला.

      कुंटूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांनी यावेळी चोख बंदोबस्त तैनात केला होता.

अनेकांचा पाठींबा !

  विशेष बाब म्हणजे या उपोषणाला मराठी पत्रकार परिषद मुंबईचे कोषाध्यक्ष विजय जोशी,नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी, राष्ट्रवादीचे युवा नेते शिरीष गोरठेकर,काँग्रेसचे युवा नेते प्रा.रविंद्र चव्हाण,शिवसेना सहसंपर्कप्रमूख गंगाधर बडूरे, अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष इंजि.चंद्रप्रकाश देगलूरकर, विभागीय युवा प्रवक्ता चंद्रसेन गंगासागरे, दिगांबर गंगासागरे,राष्ट्रवादी काॅग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर पाटील भिलवंडे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुकाप्रमुख रविंद्र भिलवंडे,भाजपाचे तालुकाध्यक्ष कोंडीबा पाटील शिंदे,मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गजानन चौधरी आदींसह विविध सामाजिक संघटना व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह पत्रकार व परिसरातील ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सरपंच,उपसरपंच व ग्रामस्थांनी पाठींबा दिला.


जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा सकारात्मक प्रतिसाद !

       महत्वाचे म्हणजे नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घुंगराळा-तलबिड निसर्ग पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी लक्ष्मणराव भवरे यांच्याच मागणीनुसार स्वतः सदरील वनक्षेत्राला नुकतीच भेट दिली असून याबाबतचा विकास आराखडा,मान्यता व निधी तरतूदीसाठी स्वतःच लक्ष देऊन प्रयत्नशील असल्याचे आपणांस सांगितले असून त्यांचाही यासाठी सकारात्मक प्रतिसाद असल्याचे व सोबतच,यासाठी आपणही आग्रही व प्रयत्नरत असल्याचे मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी उपोषणकर्ते भवरे यांना संपर्क साधून सांगितले.

   

परिपूर्ण पूर्ततेपर्यंत लढा - भवरे

                  जागृत देवस्थान श्री.खंडोबा (श्री.म्हाळसाकांत) मंदिर घुंगराळा व जागृत देवस्थान श्री.महादेव मंदिर गंगणबिड या तिर्थस्थळ/ तिर्थक्षेत्राला भरिव निधी तसेच,या दोन्ही मंदिर परिसरातील वनजमिनी एकत्रित संपादन करुनच या वनक्षेत्र व परिसराच्या सर्वांगीण विकासासह वन्नोषधी व कृषी तंत्रज्ञान विकसित झाल्यास त्यातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत भर पडेल त्याचबरोबर,भाविक भक्त व पर्यटकांची संख्या वाढून नव उद्योगालाही चालना मिळेल त्यामूळे वनविभागाकडून योग्यतेने विकास आराखडा,निधी तरतूद व उपलब्धता याबाबतचे आश्वासन मिळाले असले तरिही यासाठी परिपूर्ण पूर्ततेपर्यंत आपला लढा सुरुच राहणार असल्याचे भवरे म्हणाले.

तत्कालीन उपवनसंरक्षक ठाकरे यांच्यावर कारवाईची गरज !

       तत्कालीन उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी आपल्या कार्यकाळात वरिष्ठांकडून प्राप्त आदेशानुसार सदरची मागणी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक होते परंतू,त्यांनी वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करतांनाच स्वतःची अकार्यक्षमता झाकण्यासाठी व कर्तव्याला बगल देत या वनक्षेत्राच्या विकासात अडसर निर्माण करुन शासनाची व वरिष्ठांची दिशाभूल केली होती त्यांच्या उदासिनतेमूळेच आजपर्यंत प्रलंबित असलेल्या या कामासाठी सामाजिक भावनेतून आपण सातत्यपूर्ण कर्तव्यतत्परतेने कार्यरत असून या प्रकरणातील विलंबाच्या चौकशीसह संबधित दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाईची गरज असून त्यासाठीही आपला लढा सुरुच असेल असे उपोषणकर्ते भवरे म्हणाले.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News