भोकर (डॉ. कैलास कानिंदे) : महारक्तदान शिबीराचे आयोजन आणि एच.आय.व्ही.ग्रस्तांच्या पालनकर्त्या इन्फंट इंडियाच्या सर्वेसर्वा संध्याताई दत्ता बारगजे (पाली, जिल्हा बीड) यांना मराठवाडास्तरीय सेवा समर्पण समाजसेवा पुरस्कार व साहित्यिक तथा ज्येष्ठ पत्रकार आसाराम लोमटे ( परभणी) यांना सेवा समर्पण साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहे. असे सेवा समर्पण परिवारचे अध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
सेवा समर्पण परिवारच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी (ता. 25 ) तहसील कार्यालय भोकर येथे व ग्रामीण भागात मौजे कामनगाव येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तहसील येथील रक्तदान शिबिराचे उद्घाटन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे हस्ते होणार असून यावेळी महंत उत्तमबन महाराज, तहसीलदार राजेश लांडगे), पं.स.उमरीचे माजी सभापती शिरीष देशमुख गोरठेकर ), गट विकास अधिकारी अमित राठोड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तसेच सेवा समर्पण परिवार भोकरच्यावतीने या वर्षी एच.आय.व्ही.ग्रस्तांच्या पालनकर्त्या तथा इन्फंट इंडियाच्या सर्वेसर्वा संध्याताई दत्ता बारगजे (पाली, जिल्हा बीड) यांना मराठवाडास्तरीय सेवा समर्पण समाजसेवा पुरस्कार व साहित्यिक तथा ज्येष्ठ पत्रकार आसाराम लोमटे (परभणी) यांना सेवा समर्पण साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहे असे सेवा सेवा समर्पण परिवारचे अध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. या पुरस्काराचे स्वरूप रोख 11 हजार रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह असे राहणार असून हा पुरस्कार सोहळा रविवारी (ता. 02 एप्रिल ) दिगांबरराव बिंदू महाविद्यालय सभागृहात पार पडणार आहे. पुणे येथे संपन्न झालेल्या 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस, माजी राज्यमंत्री डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर, उपमुख्यमंत्री कार्यालयातील अव्वर सचिव राजेंद्र खंदारे, नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.




No comments:
Post a Comment