विविध उपक्रमाच्या आयोजनातून शहरात व तालुक्यात महानायक राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती हर्षोल्हासात साजरी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, April 15, 2023

विविध उपक्रमाच्या आयोजनातून शहरात व तालुक्यात महानायक राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती हर्षोल्हासात साजरी

 



किनवट :विविध उपक्रमाच्या आयोजनातून शहरात व तालुक्यात महानायक राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती हर्षोल्हासात साजरी करण्यात आली.

        भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा किनवट आणि राष्ट्रपिता जोतीराव फुले व राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव शहर व तालुका समिती सिद्धार्थनगर किनवट यांच्या वतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रांगणामध्ये मुख्य अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांनी सर्वप्रथम पुष्पहार अर्पूण ज्ञानपूजा करून पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण केले. 

         यावेळी आमदार भीमराव केराम , माजी आमदार प्रदीप नाईक , माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार , के. मूर्ती , साजिद खान, व्यंकटराव नेम्माणीवार,  जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अनिल पाटील कऱ्हाळे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक नेम्माणीवार , शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्माणीवार , भाजपायुवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष उमाकांत कऱ्हाळे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भरकड, माजी उपनगराधक्ष अभय महाजन, माजी नगरसेवक जहिरोद्दीन खान , ऍड. के. के. साबळे, किसान मोर्चाचे राज्य सेक्रेटरी कॉ. अर्जून आडे , वन विकास महामंडळाचे निवृत्त वन व्यवस्थापक वसंत सर्पे , सेक्युलर मुव्हमेंटचे सरचिटणीस ऍड. मिलिंद सर्पे , पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष विनोद भरणे , परमेश्वर कावळे , रिपाईचे तालुकाध्यक्ष विवेक ओंकार, राहुल कापसे, अभय नगराळे, वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. राहूल सोनकांबळे , सुभाष कयापाक , मिलिंद धावारे , ऍड.जी.एस. रायबोळे , आम आदमी पक्षाचे पी.एस. चाटसे , भावसिंग राठोड , गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बणे , उप विभागीय पोलिस अधिकारी विजय डोंगरे , पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, सहायक पोलीस निरीक्षक विशाल वाठोरे , पीएम पोषण योजनेचे अधिक्षक अनिल महामुने , पत्रकार गोकुळ भवरे , आनंद भालेराव , दुर्गादास राठोड , दिलीप पाटील, सुरेश कावळे , गंगाधर कदम, अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाचे तालुकाधक्ष प्रा. रविकांत सर्पे , तालुका सरचिटणीस प्रा. डॉ. पंजाब शेरे, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर भोयर,  युवा सेनेचे तालुकाध्यक्ष अतुल दर्शनवाड , तथागत गायकवाड, राष्ट्रवादीचे युवा तालुकाध्यक्ष बालाजी बामणे, युवासेना तालुकाध्यक्ष अजय कदम पाटील , सुभाषबाबू नायक , देवराव सोनकांबळे, वंचित बहुजन आघाडीचे सुरेश जाधव, माधव कावळे, बाबाराव भगत , प्रकल्पस्तरीय आढावा समितीचे माजी अध्यक्ष प्रा. विजय खुपसे, ऍड. सुनिल येरेकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचार मंचच्या अध्यक्ष प्राचार्या शुभांगीताई ठमके, करुणा आळणे, सूर्यकांता सर्पे, स्मिता कानिंदे, आशा कावळे, रत्नमाला भरणे , ऍड. दिव्या पाटील- सर्पे, ऍड. दिपाली सोनकांबळे, ऍड. आकांक्षा आळणे , कल्पना सर्पे, अनुसूचित जाती महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा गंगुबाई परेकार, विद्या पाटील , भाराकांग्रेसचे गिरीश नेम्माणीवार , उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज घडसिंग, डॉ. सुनंदा भालेराव, डॉ. आशिषकुमार बनसोड, डॉ. अभिजीत ओव्हळ , डॉ. महेंद्र कांबळे, डॉ. संजय लोमटे, ऍड. के. के. साबळे, रमेश मुनेश्वर ,  अजिंक्य आळणे, बसपाचे नांदेड झोन प्रभारी प्रा. डॉ. आनंद भालेराव, विधानसभा प्रभारी युवराज रिंगणमोडे, विधानसभा अध्यक्ष किशन परेकर, तालुका अध्यक्ष चंद्रकांत कांबळे, सचिन मुनेश्वर, महिला आघाडीच्या सुनंदा पाटील, योगिता मुनेश्वर, संविद्या मुनेश्वर, जिजाबाई कांबळे आदिंसह जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष ऍड. सम्राट सर्पे व सर्व पदाधिकारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पार्पूण अभिवादन केले. 

          उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. भारतीय बौद्ध महासभेचे पर्यटन व प्रचार विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र नरवाडे व संस्कार विभागाचे तालुका सचिव अनिल उमरे यांनी बुद्ध वंदना घेतली. समता सैनिक दलाचे कॅप्टन राहूल घुले यांनी मानवंदना दिली. 

         बस स्थानक येथे आमदार भीमराव केराम , जेतवन बुद्ध विहार सिद्धार्थनगर येथे अभि. प्रशांत ठमके , जयभीमनगर येथे मिलिंद लोकडे यांचे हस्ते तसेच समतानगर , बुद्धभूमी परिसर रेल्वे कॉलनी, गंगानगर सह विविध नगरात पंचरंगी धम्मध्वजाचे ध्वजारोहन करून अभिवादन करण्यात आले.

       मोटार सायकली काढून तरुणांचे अभिवादन 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते एस.व्ही. एम. कॉलनी, व्ही. आय.पी. रोड , सवित्रीमाई फुले चौक समतानगर , बिरसामुंडा चौक विद्यानगर , बाळासाहेब ठाकरे व टिपुसुलतान चौक गोकुंदा , महाराणा प्रताप चौक , अशोक स्तंभ , मॉ जिजाऊ चौक, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम चौक, संविधान चौक , छत्रपती शिवराय चौक, जेतवन बुद्ध विहार, महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले स्मारक चौक , साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक मार्गे मोटार सायकली कादून तरुणांनी आपला उत्साह दाखविला.  

      शिवाजीनगर जयंती मंडळाचे वतीने डॉ. बाबासाहेब चौकात बुंदी वाटप , एस.टी. कर्मचारी यांचे वतीने बसस्थानक, रेल्वे कर्मचारी यांचे वतीने रेल्वे स्टेशन व जयंती उत्सव समितीच्या वतीने जेतवन बुद्ध विहार येथे महाभोजनदान देण्यात आले. जेतवन बुद्ध विहार सिद्धार्थ नगर येथून दुपारी 4 वाजता भव्य दिव्य रथात सजविलेल्या महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. यात हजारोंच्या संख्येनी महिला, पुरुष , युवक , युवती यांचा सहभाग होता. अत्यंत आकर्षकपणे काढलेली मिरवणूक शिस्तबद्ध शांततेत पार पडली. धगधगत्या उकाड्यात वरुणराजाने बरोबर रात्री दहा वाजता पर्जन्यवष्टी करून महामानवाला अभिवादन केले आणि जेतवन बुद्ध विहार सिद्धार्थनगर किनवट येथे मिरवणूकीचा समारोप झाला.

        उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याबद्दल पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे उत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष ऍड. सम्राट सर्पे यांनी आभार मानले. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष विनोद भरणे , सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वाठोरे , उत्तम कानिंदे यांचेसह पोलिस अधिकारी कर्मचारी आदींची उपस्थिती होती.


         तक्षशिला बुद्ध विहार येथे महेंद्र नरवाडे, सागर शेंडे व प्रा. एस. डी. वाठोरे यांनी बुद्ध वंदना घेतली. येथून उत्तमराव राठोड शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चौकाचे ' डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ' असे नामकरण करण्यात आले. डॉ. आंबेडकर नगर येथील श्रावस्ती बुद्ध विहारात सखाराम घुले यांचे हस्ते ध्वजारोहन झाले. 



पंचशील नगर येथील नालंदा बुद्ध विहार येथे जे. टी. पाटील यांचे हस्ते ध्वजारोहन झाले. यावेळी माजी तहसिलदार उत्तम कागणे माजी नायब तहसिलदार भाऊराव जाधव , माजी वनक्षेत्रपाल प्रल्हाद मोरे आदिंची उपस्थिती होती. राजर्षी शाहूनगर गोकुंदा येथील सम्राट अशोक बुद्ध विहार येथे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सिद्धांत खोब्रागडे यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. 



गोकुंदा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय येथे अभि. प्रशांत ठमके यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. महेंद्र नरवडे, अनिल उमरे व प्रा. सुभाष गडलिंग यांनी बुद्ध वंदना घेतली. त्यानंतर उत्सव समिती अध्यक्ष प्रमोद कोसरे यांच्या नेतृत्वात गोकुंदा येथून धम्मरॅलीने सर्व उपासक उपसिका किनवट शहरातील डॉ. बाबासाहेबआंबेडकर पुतळा प्रांगणात आयोजित मुख्य अभिवादन व ध्वजारोहन कार्यक्रमासाठी उपस्थित झाले.


 राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने फळे वाटप


विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने किनवट येथील संथागार वृद्धाश्रमामध्ये वृद्धांना फळे वाटण्यात आले. 

        प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पूण व अभिवादन करण्यात आले.  यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी बामणे मलकवाडीकर, मनोज श्रीराम, अमोल जाधव, अश्विन पवार, कपिल सातव, निखिल सर्फे, प्रमोद कोसरे , महेश तंबाखूवाले, अनिकेत भरणे, ब्रह्मा एडके, साहिल भवरे, आर्यन कांबळे, पृथ्वीराज टारपे, संकेत केंद्रे, मोनू गायकवाड, सतिष कापसे, प्रतीक नगराळे आदींसह मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी युवक  कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News