एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल प्रवेशपूर्व परीक्षेत एकात्मिक आदिवासी विकास किनवट प्रकल्पातील शासकीय आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, May 15, 2023

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल प्रवेशपूर्व परीक्षेत एकात्मिक आदिवासी विकास किनवट प्रकल्पातील शासकीय आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

 







किनवट : येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शासकीय आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल प्रवेशपूर्व परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केल्या बद्दल कौतुक होत आहे.

           एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल प्रवेशपूर्व परीक्षेमध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट अंतर्गत कार्यरत असलेल्या एकूण १६ शासकीय आदिवासी आश्रमशाळांतील इयत्ता ६ वी साठी २१ विद्यार्थी, ७ वी साठी १० विद्यार्थी ,  ८ वी साठी ९ विद्यार्थी,  ९ वी  साठी ६ विद्यार्थी  असे एकूण ४६ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र झाले असून  इयत्ता ६ वी साठी १४ विद्यार्थी, ७ वी साठी १ विद्यार्थी व  ९ वी साठी ३ विद्यार्थी असे एकूण १८ विद्यार्थी प्रतिक्षा यादीमध्ये प्रवेशासाठी  पात्र आहेत.  प्रकल्प अधिकारी  नेहा भोसले(भाप्रसे)  यांनी स्वत: या प्रवेशपूर्व परीक्षेकडे व्यक्तिश: लक्ष देऊन प्रकल्पातील आदिवासी आश्रमशाळांतील इयत्ता पाचवीचे सर्व विद्यार्थी व क्षमता चाचणी परीक्षा २०२२-२३ मध्ये इयत्ता सहावी व सातवीमध्ये प्रथम श्रेणीत आलेले सर्व विद्यार्थी या परीक्षेस बसविण्याबाबत कार्यवाही केली होती. त्यामुळे प्रकल्प अधिकारी यांचे प्रकल्पातील पालकांकडून विशेष आभार व्यक्त केल्या जात आहे.

        महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून महाराष्ट्र राज्यात एकूण ३७ एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल कार्यरत असून  अमरावती आदिवासी विकास विभागामध्ये सहस्त्रकुंड, बोटोणी, चिखलदरा व धारणी या  चार शाळा कार्यरत आहेत. एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल  स्कूल प्रवेश परीक्षेत निवड  झालेल्या विद्यार्थांना इयत्ता 6 वी ते  इयत्ता 12  वी पर्यंतचा सीबीएसई अभ्यासक्रम निःशुल्क  शिकायला   मिळतो. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांतून  अनेक गुणवंत विद्यार्थी घडू शकतात.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News