मनोज गिमेकर यांना पत्रकारितेत डॉक्टरेट - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, May 8, 2023

मनोज गिमेकर यांना पत्रकारितेत डॉक्टरेट

 


भोकर/नांदेड ( डॉ. कैलास कानिंदे ) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, माध्यमशास्त्र संकुल अंतर्गत  आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेअंतर्गत जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विषयातील विद्यावाचस्पती पीएच.डी. पदवीसाठी प्रोफेसर डॉ. दीपक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक मनोजकुमार पंढरीनाथ गिमेकर यांनी  'ग्रामस्वच्छता व संत गाडगेबाबांच्या कीर्तनाचा संवादशास्त्रीय अभ्यास ' (कालखंड : १९५१ - १९५६ ) या विषयावर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात शोधप्रबंध सादर केला होता. त्यांना विद्यापीठाने पीएच.डी पदवी दिली आहे. पत्रकारितेत डॉक्टरेट पदवी मिळविणारे भोकर तालुक्यातील ते पहिले पत्रकार आहेत.

       सामाजिक, राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेले मनोज गिमेकर हे भोकरचे माजी नगरसेवक असून उत्कृष्ट निवेदक आहेत. यापुर्वी याचं विषयात त्यांनी एम.फिल.पदवी संपादन केली आहे. जनसंवाद व वृत्तपत्रविद्या या विषयात त्यांना पीएच.डी.पदवी मिळाल्याने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मंत्री डी.पी. सावंत, माजी आमदार अमरनाथ राजूरकर, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी, माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. सुहास पाठक, डॉ. सचिन नरंगले, डॉ. बालाजी शिंदे, डॉ. चंद्रकांत बावीस्कर, प्राचार्य डॉ. पजाब चव्हाण, डॉ. जे. टी. जाधव, डॉ. सिद्धार्थ जाधव, डॉ. कैलास यादव, डॉ. डॉ.बालाजी विजापुरे, डॉ.धम्मपाल जाधव, डॉ. कैलास कानिंदे, डॉ. भारत कल्याणकर,बसवेश्वर दंडवे, गंगाधर चव्हाण ,धम्मपाल तोडे, डॉ.उत्तम कानिंदे आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News