भोकर (नांदेड) : बहुजन समाज पार्टी या पक्षाच्या संघटन बांधणीसाठी भोकर येथील शासकिय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आगामी होणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टी ताकदीने उतरणार आहे. त्यासंदर्भात महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन निवडणुकीच्या रणनीतीबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
भोकर तालुक्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका बसपा स्वबळावर लढविणार आहे . त्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे,असे प्रतिपादन बसपाचे प्रदेश महासचिव दिगांबर ढोले यांनी केले. शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बसपा च्या बहन कु मायावती यांच्या आदेशानुसार नवीन प्रदेश प्रभारी मनिष आनंद, प्रदेश अध्यक्ष अॅड संदीप ताजणे, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मनिषभाऊ कावळे, प्रदेश महासचिव दिगंबर ढोले, जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण वायवळे, जिल्हा सचिव तथा भोकर विधानसभा प्रभारी डॉ. कैलास कानिंदे, भोकर विधानसभा अध्यक्ष जयवंत थोरात, तसेच सामाजिक कार्यकर्ते श्रीधर जाधव उपस्थितीत बसपा पक्षाची पुनर्बांधणी सुरू आहे . तालुक्याची जबाबदारी आपल्यावर असून, येथील जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी परिश्रम घेण्याची गरज असल्याने भोकर विधानसभा बुथ, सेक्टर निहाय बांधणी करून भाईचारा समाजाला जोडून येणाऱ्या निवडणुकीत सक्षमपणे उमेदवार देणार,आम्ही सर्व ताकतीनिशी निवडणूक लढविणार असल्याचे ढोले यांनी सांगीतले . यावेळी तालुका अध्यक्ष कैलास कदम, उपाध्यक्ष प्रफूल जाधव, महासचिव राजपाल हनवते, सचिव शिवाजी जंपलवाड, पदमशाली भाईचारा समाजाचे तालुका अध्यक्ष राजेश मानपुरे, वडार भाईचारा समाजाचे तालुका अध्यक्ष केशव मारोती बाभळे, सेक्टर अध्यक्ष धम्मपाल हनवते, सेक्टर अध्यक्ष महिला आघाडी पंचफुलाबाई जाधव व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




No comments:
Post a Comment