भोकर : येथे बसपाच्या संघटन बांधणी बैठकीमध्ये कैलास कदम यांची बसपा या पक्षाच्या तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
भोकर येथे बसपा ची संघटन बांधणी बैठक संपन्न झाली. यावेळी प्रदेश महासचिव दिगंबर ढोले, जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण वायवळे, जिल्हा सचिव तथा भोकर विधानसभा प्रभारी डॉ. कैलास कानिंदे, भोकर विधानसभा अध्यक्ष जयवंत थोरात, सामाजिक कार्यकर्ते श्रीधर जाधव उपस्थित होते.
तसेच तालुका अध्यक्ष कैलास कदम, उपाध्यक्ष प्रफूल जाधव, महासचिव राजपाल हनवते, सचिव शिवाजी जंपलवाड, पदमशाली भाईचारा समाजाचे तालुका अध्यक्ष राजेश मानपुरे, वडार भाईचारा समाजाचे तालुका अध्यक्ष केशव मारोती बाभळे, सेक्टर अध्यक्ष धम्मपाल हनवते, सेक्टर अध्यक्ष महिला आघाडी पंचफुलाबाई जाधव व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




No comments:
Post a Comment