भोकरमध्ये अवैद्य रेतीची सर्रास वाहतूक;महसूल पथक अर्थकारणात झोपेत - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, June 18, 2023

भोकरमध्ये अवैद्य रेतीची सर्रास वाहतूक;महसूल पथक अर्थकारणात झोपेत

 


भोकर ( डॉ. कैलास कानिंदे )  : रेती वाहतूकीवर बंदी असताना तालुक्यात रात्री-बेरात्री रेतीची अनाधिकृत वाहतूक होत असून महसूल विभाग याकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष करित आहे.

     शहरातील विविध भागात ईमारतीचे बांधकाम चालू आहेत. या बांधकामाकरिता रेती सहज उपलब्ध होत आहे. महसूल विभागाकडून रेती मूरुम वाहतूकीवर बंदी असताना रेती शहरात येत आहे. रात्रीला टिप्परने रेतीची वाहतूक केली जात आहे. महसूल विभागाने नेमलेले पथक हे नावालाच असून पथक झोपेत असताना हा कारभार सर्रासपणे चालू आहे. शहरातल्या विविध वार्डात होत असलेल्या ईमारतीच्या बांधकामावर रेतीचे ढिगारे पहावयास मिळत आहेत. महसूल प्रशासनाची याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक होत आहे. रेती वाहतूक करणारे कोण याची कल्पना संबधित विभागाला असून देखील त्यांचेवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. हजारो ब्रास अनाधिकृत रेती शहरात येत आहे. नेमलेले पथक रेतीतस्करांशी अर्थिक हितसंबध जोपासत असल्यानेच हा कारभार होत असल्याचे बोलल्या जात आहे. भोकरला रेती आणणारे कोण टिप्परचे मालक कोण याची सर्व माहिती महसूल विभागाकडे असताना देखील याकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येते .कसल्याही प्रकारचे नियंत्रण दिसत नाही. सहजरित्या रेती उपलब्ध होत असल्याने शहरात बांधकामे जोरात चालू आहेत. यामूळे शासनाचा महसूल बूडत आहे. अशा अनाधिकृतपणे रेतीची वाहतूक करणार्‍या टिप्पर चालकाविरोधात महसूल पथकांकडून कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News