नांदेड येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमाची युद्धपातळीवर तयारी ▪️सर्व विभाग प्रमुखांकडून लाभार्थ्यांचे नियोजन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, June 24, 2023

नांदेड येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमाची युद्धपातळीवर तयारी ▪️सर्व विभाग प्रमुखांकडून लाभार्थ्यांचे नियोजन

 


 

नांदेड (जिमाका)  : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार 25 जून रोजी “शासन आपल्या दारी” हा भव्य कार्यक्रम अबचलनगर नांदेड संपन्न होत आहे. या कार्यक्रमाची जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर पूर्व तयारी केली जात आहे. प्रत्येक लाभार्थ्यांला या कार्यक्रमात विनासायास सहभागी होता यावे यादृष्टीने गटनिहाय नियोजन केले आहे. उष्णता व इतर बाबी लक्षात घेता मुबलक प्रमाणात पिण्याच्या पाण्यासह इतर व्यवस्था काटेकोरपणे करण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी सर्व गटनिहाय अधिकाऱ्यांना दिल्या. 

 

जिल्हाधिकारी कार्यालयात “शासन आपल्या दारी” या अभियानाच्या पूर्व तयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय दंडाधिकारी विकास माने, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रमुख गजानन पाटील, मराठवाडा प्रमुख बाबासाहेब थेटे व इतर विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. 

 

इतर जिल्ह्यातील कार्यक्रमांचा अनुभव पाठिशी घेवून नांदेड येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे मिनिट टू मिनीट व शहरात येणाऱ्या वाहतुकीचे नियोजन पोलीस व परिवहन विभागाने केले आहे. हा कार्यक्रम अधिकाधिक लोकसहभागातून शासकीय योजनांचा महाउत्सव बनेल, असा विश्वास अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News