पँथर : नामांतर शहीद जनार्दन मवाडे - एक तूफान..! अभियंता डॉ. विवेक जनार्धन मवाडे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, August 4, 2023

पँथर : नामांतर शहीद जनार्दन मवाडे - एक तूफान..! अभियंता डॉ. विवेक जनार्धन मवाडे

 


4 ऑगस्ट 1978 रोजी नामांतर आंदाेलनातील पहिले शहीद जनार्दन मवाडे यांच्या शौर्यांच्या स्मृतींचे क्रांतिशब्द मांडताहेत खुद्द शहीदपुत्र अभियंता डॉ. विवेक मवाडे


============================

नामांतर आंदाेलना तील सर्व 150 शाहिदांना विनम्र अभिवादन..!

============================

4 ऑगस्ट 1978..या

आंदाेलनाच्या दिवशी 500 शे च्या जमावणे घेरून  ..'जन्याला आज मारून जाणार.'.असे म्हणून माझे कुंकु माझ्याच पदराने पुसले गेले .            

-ताईबाई जनार्दन मवाडे( शहीदवीर पत्नी)

============================

     तारीख ४ आँगस्ट१९७८ च्या सकाळी २००० ते २५०० जातीयवादी नामांतर विराेधी ओबीसीतील मराठा ,कुणबी ,वाणी ,हटकर, मातंग या जातीसह अनेक जातींनी एकत्रित येवून सुगाव(बु.), ता.नांदेड या गावावर हल्ला केला. कारण काय ? तर मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देवू नये, त्यामूळे यांच्या घरात मुलांच्या डीग्रीवर नाव येईल ते नकाे हाेते..हे वरकरनी कारण पण मुळात जातीयता हे यांचे मुळव्याध हाेती. 

     २७ जुलै १९७८ ला विधानमंडळाच्या दाेन्ही सभागृहात पास झालेला ठराव आणि राजकारण यांची सांगड घालून खेळलेला  जातीयवादी सरकार व मराठा समाज यांचा डाव म्हणजे नामांतर विरोधी आंदोलन. खरे तर त्यावेळी नेमके हल्ल्याचे कारण समाजाला कळेपर्यंत हत्या, बलात्कार, जाळपाेळ, नासधूस, तोडफोड यांचा नभूताे न भविष्यती प्रकार सुरू झाला. सकाळची वेळ साडेचार ते पाचची हाेती. गावातील लेकरंबाळ, बाया ,म्हातारे झाेपेत हाेती .हल्ल्याच्या आदल्या दिवशी काही लाेकांनी गावातील शाळा बंद करण्यासाठी १०० च्या जमावांनी बाचाबाची केली. याची माहिती जनार्दन मवाडे यांना मिळताच हातात काठी घेवुन काही लाेकांसाेबत जावुन ते जमावाला भिडले. जनार्दन मवाडेंची दहशत हाेती. त्यांननी जमावाला पिटाळून लावले. पण ते माघारी जातांना धमकी देवून गेले... 'जन्या तुला साेडणार ना ही..!' ,

   'आरे जा रे जन्या ईतका साेपा नाही तुमच्या चार दाेन बायकांची कुंकू पूसल्या बगर मरणार नाही... 'जनार्दनने उत्तर दिले ..!! त्यांच्या या सामाजिक व लढाऊ स्वभावाला जातीयवादी मराठे गुंड म्हणत , याची त्याला पर्वा नव्हती. अनेक वेळा खाेट्या केसेस करून पाेलीस स्टेशनला पैसे देवून त्यांना जेलात पाठवले होते. 

     त्यावेळी त्यांच्या पत्नी व मुलं उपाशी झाेपायची. पत्नी मिळालं ते काम व  निंदन खुरपन करायची. चांगले जेवन तेव्हा विषय नव्हता , एक वेळ कन्या, भरडा, आंबिल मिळाले तरी खुप वाटायचे. जे जमेल ते काम करायची..आंदाेलनाच्या दिवशी आदल्या रात्रिला जनार्धन ने जुनी तलवार काढून घासुन ठेवली हाेती..कदाचित त्यांना व त्यांच्या मित्रांना गावावरील जातीय हल्ल्याची कुणकूण लागली आसावी.. पंढरपूरला दिंडीला जावुन ये णाऱ्या  लाेकांसाठी  पलिकडल्या सुगांव (खु.) गावातील माराेतीच्या पारावर मावंदाचे जेवन ठेवले हाेते..विठलाचा गजर, हातात टाळ चिपळ्या धरणारी हातं रात्री सैतान होऊन खुनी झाली.

त्याच हातात विठ्ठलाच्या साक्षीने भाले, बर्च्या, कुर्हाडी, ऊस ताेड कत्या, दगडं आली..

सकाळी. ४:३० र्त ५ च्या दरम्यान आमचे झाेपडे पहिले फूकुन दिले.. यात आम्ही राहत होतो..कुडाचे होते..उसाचे पाचट लावलेले..  जनार्धननी त्यांचे मित्र खाेडके यांचेकडे पत्नी व तीन मुले आश्रयासाठी रात्रिच पाठवले हाेते, मुलगी, दाेन मुलं  व पत्नी लपून बसले..!

     नामांतर विरोधी जातीयवादी मराठ्यांनी                     

...तासा दिड तासात सर्व गाव पेटविला, वाटले सकाळ झाली सूर्य उगवला पण ताे ऊजेड पेटलेंल्या झाेपड्यांचा हाेता..त्यात जनार्धनचा  ही संसार जळत हाेता. पण पर्वा कशाची. गावातील मित्रांनी सांगीतले जनार्दन लेकरबाळ घेवून नांदेडला जा..! ते म्हणाले नाही, आज डॉ. बाबासाहेबांच्या नावासाठी जीव गेला तरी चालेल पण पळून जाणार नाही.. आज जाईल उद्या काेणत्या ताेंडानी गावात येवू ? मी भेकडासारखा मरणार नाही..100 दिवस शेळी होऊन जगण्या पेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगेन ..! पँथर आहे लढून मरेल..!! मारून मरेल़, पण पळणार नाही.. काका ! माझ्या लेकरांना व पत्नीला लपवा मुले लहान आहेत.. गावावर हल्ला सुरूच हाेता. दिसतील त्या घरातील बाबासाहेबांच्या, बुद्ध प्रतीमा फेकून फाेडत हाेते. बायका म्हातारे यांना बेदम मारहान चालू हाेती..मेलो..!! वाचवा..धावा..!! च्या गगन भेदी आवाजांने गाव भेदरले हाेते. बेसावधपणे हल्ला झालेला पाहून सर्वांनी आपआपला जीव कसा वाचेल हे बघीतले.. ईकडे जनार्दन एकटा लढन्याच्या तयारीने हातात तलवार घेऊन बाहेर पडला.. शेवटची पत्नीची नजरानजर  झाली.. ईशाऱ्याने सांगीतले मुलांची काळजी घे.. पत्नीने ही ईशारा केला आणि पती जनार्धन  नजरे आड झाला.. हातात तलवार व डाेक्याला जरमनचे रूमालाने बांधलेले ताट एव्हढेच काय ते सुरक्षते साठी हाेते..!! इतक्यात तिथे जमाव आला.. त्यात नकटया न्यानेराव नाव हाेते त्याचे ताे पलीकडच्या गावचा हाेता..त्यांने जनार्धनची मुलं जीथे उतरंडीत एकावर एक लपवले हाेते ते घर फूकुन दीले..!!ईकडे पती लढताे तर दुसरीकडे मुलं घरात जळतात हे पत्नी ताईबाई हताश पणे पाहत होती. ईतक्यात नकटा न्यानेराव याची नजर जनार्धनच्या पत्नी कडे वळली आणि त्याने ओळखले..आरे.. इकडे या.!! जन्याची बायकाे भेटली, तसे ५०० लाेकांनी  ताईबाईला चाेहाे बाजूंनी घेरले..मु लं आगीत लपलेले त्यांचे काय झाले आसेल..? पतीचे काय झाले आसेल या विचारात असतांना एकजन जमावातुन पुढे आला, त्याने ताईबाईच्याच पदरांने  कुंकू पुसले  व म्हणाला.. 'जन्याला आज मारूनच जावु..! ताे मेला म्हून समज..! '  परंतु जनार्दन मवाडे पँथर हाेता. एका दाेघाची हिम्मत नव्हती.. ताईबाईचे कुंकू पूसून जत्था जनार्धनच्या शाेधात निघाला.  या संधीचा फायदा घेवून ताईबाई  जळत्या घरातील मुलांना वाचविण्यासाठी आगीत शिरली अन् मुलांना बाहेर काढले.

      जमावातील लाेकांनी खाेडके काका यांना बेदम मारहान केली यात पुढे त्यांचे दाेन्ही डाेळे गेले.. ताईबाईची नजर पतीला शाेधत हाेती. ईतक्यात  आवाज आला..! आरे या ईकडे ..जन्या भेटला पळा तिकडे.. त्याला जिवंत ठेवू नका नाहीतर उद्या ताे एकालाही जिवंत ठेवणार नाही. आपले बी संपवून टाकेल.. ताईबाईच्या मनात विद्रोहाचे विचार पेटले.. मनात शेवटचा ईशारा झाला हे लाेक  पतीला जिवंत ठेवणार नसतिल तर डाॅ. बाबासाहेबांच्या नावासाठी ५/६ ला कापून मरावे नाव तर हाेईलच. मनाचा थरकाप हाेत हाेता. एैनवेळी सोबत असणारे लढ्यातील लाेक दिसेनासे झाले, जनार्दन एकटा लढू लागला.. ५०० लाेकांनी एका अरूंद जागेत जनार्दनला घेरले. तरी पँथरने हार मानली नाही. बाेथट तलवारीने जातीय वाद्यांवर पून्हा त्वेषाने वार परतवून हल्ला करू लागला. जनार्दन आटाेक्यात येत नव्हता त्यांची माणसे घायाळ हाेवून पडू लागली.. पून्हा दूसरी पूढे येवू लागली.. जनार्दनने नांदेड येथील फायर फायटींगचा १५० लाेकांसाेबतचा काेर्स केला हाेता. ताे कामी आला. अंगावर जनार्दन चया एका नंतर ऐक जख्मा वाढत हाेत्या पण ताकद १० हत्तीची हाेती, शेवटी एकटा हाेता. कूणीही साथ देणारे नव्हते.. दोन तास कडवी झुंज देवून झाले. तलवार चालत हाेती.. एव्हढयात  वाघिच्या गन्या मांगाने घात केला. घरावर चढून वरून जनार्दनवर  दोरीचा फास फेकला आणि आवळला. त्यावेळी सर्वांनी पूढे येवुन सपासप वार सुरू केले. जनार्दनच्या हातातील तलवारीची पकड  अधिक मजबूतीने आवळू लागली.  छ.शिवाजी महाराज की जय या घोषनेने जनार्धन मवाडे यांच्या अंगावर  जतियवाद्यांनी ३ इंच खाेल १५० घाव दिले... ते लिंबगाव पाेलीसांच्या पंचनाम्यात कोर्टात सादर झाले..!

     डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय ! म्हणून पँथरने जीव साेडला ,तेव्हा डाेळ्यात जरब ठेवून शहीद झाला..!! नामांतर लढ्यात अंगावर 150 घाव झेलून मरणारा एकच पँथर झाला दूसरे काेणी नाही...!

नामांतर १४ जानेवारी १९९४ ला झाले पण आजचा दिवस 4 ऑगस्ट.. आपल्या समाज कुटूंबासाठी फार महत्वाचा आहे..!

      पुढे ईतीहास आजून बाकी आहे..३८ वर्ष या सरकारशी पुन्हा लढलाे न्याय मिळाला नाही, घर नावावर नव्हते, लेकरं लहान सुगाव(बु.), साेडून नांदेडात आले..पुढचा संघर्ष चालू झाला..पुढाऱ्यांनी नामांतर आंदाेलनाला स्वत:साठी वापरले.. पूढे अनेक शहीद झाले अन् त्यांचे संसार संपले. ताईबाई आजपर्यंत विद्यापीठाच्या कुलगुरूंना शहीदांच्या स्मारकासाठी भांडली.! दोन एकर जागा विद्यापीठात शाहिदांच्या स्मारकासाठी मागील वर्षी मिळाली.. स्मारक होईल इतिहास जिवंत ठेवण्यासाठी..!

शाहिद जनार्धन मवाडे परिवाराची मुलं माेठी झाली,

डॉ.ईजी.विवेक मवाडे उप.कार्यकारी अभियंता आहे, नात डॉक्टर झाली नातु इंजीनियर झाला..!

शाहिद परिवार पुन्हा लढतोय्, लढू आमच्या शेवटच्या श्वासा पर्यंत समाजासाठी..!

सर्व शाहिदांना विनम्र अभिवादन..!

क्रांतिकारी जयभिम !


-अभि. डॉ.विवेक जनार्धन मवाडे , नांदेड

(9665533671 )

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News