जिल्हा परिषदेच्या 581 रिक्त पदाकरिता 25 ऑगस्टपर्यंत अर्ज आमंत्रित - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, August 5, 2023

जिल्हा परिषदेच्या 581 रिक्त पदाकरिता 25 ऑगस्टपर्यंत अर्ज आमंत्रित

 

     


                             

गडचिरोली,(जिमाका) ता.05: जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या आस्थापनेवरील गट - क संवर्गाची रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी 5 ऑगस्ट 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर पदे जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागातील आहेत गट- क मधील विविध संवर्गाच्या एकूण 581 रिक्त पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी 5 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2023 पर्यंत आहे. 

इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibps online.ibps.in/zpvpjun23/  या संकेतस्थळावर तारीख 25 ऑगस्ट 2023 रोजी च्या रात्री 23.59 वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या www.zpgadchiroli.in या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News