हिंगोली, ता.१६ : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील महत्वाच्या प्रकल्पना मजुरी करिता बैठक संपन्न झाली यावेळी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळ व मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती होती.
छत्रपती संभाजी नगर येथे शनिवारी (दि.१६) मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये पैनगंगा नदीवरील
हदगांव तालुल्यातील पांगरा,गोजेगांव व बनचिंचोली हिमायतनगर तालुक्यातील घारापुर किनवट तालुक्यातील किनवट,मारेगांव आणि माहूर तालुक्यातील धनोडा या सात बंधाऱ्यांना मजुरी मिळाली आहे. यामुळे २५ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. हदगांव,हिमायतनगर,कळमनुरी पुसद, उमरखेड,महागांव, माहूर व किनवट या तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. त्याच बरोबर किनवट तालुक्यातील महत्वांच्या देवस्थान उणकेश्वर येथे उच्चपातळी बंधारा मंजूर करण्यात आला असून त्यासाठी २३४ कोटी मंजूर केले आहेत.
उर्ध्व पेनगंगा प्रकल्पातून आंध्रप्रदेश मध्ये वाहून जाणारे पाणी वाहून जाऊ नये यासाठी २४ वर्षापासून शेतकऱ्यांची मागणी होती. याची दखल घेत मा.खा.हेमंत पाटील यांनी मागील चार वर्षात सातत्याने प्रयत्न केले. त्यात MWRRA, (जललवाद) ,SLTAC यांच्याकडे वयक्तिक पाठपुरावा करून रखडलेल्या मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न केले. याचा फायदा पैनगंगेच्या दोन्ही तीरावरील शेतकऱ्यास होणार असून हिंगोली,नांदेड व यवतमाळ जिल्यातील एक लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. पैनगंगा प्रकल्प होऊन ४० वर्ष झाली ४० वर्षा पासून कॅनल व चाऱ्या यांची दुरुस्ती झाली नसल्यामुळे पाणी शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नव्हते. या सुधारित प्रशासकीय मान्यतेमुळे नांदेड,हिंगोली यवतमाळ जिल्ह्यातील सर्व कॅनॉल दुरुस्त होणार आहेत. या मान्यते बरोबच हिंगोली जिल्ह्यातील खरबी येथील २० कोटी रुपयांचा बंधारा, हिंगोली शहरासाठी आवश्यक असणाऱ्या पिंपळगाव खुटा तलावास सुद्धा मान्यता देण्यात आली आहे. वसमत येथे हळद संशोधन केंद्राचे काम वेगाने चालू आहे. त्याला पूरक म्हणून २५० एकरवर मल्टी मोडल लॉजीस्टिक पार्क व हळदीचे क्लस्टर उभे राहत असून भूसंपादन कामास तातडीने सुरवात करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याचं बरोबर हिंगोली येथील मेडिकल कॉलेजचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडलेला होता. या साठी ४८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून लवकरच जागेचा ही प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक लावण्यात येईल. असे खा हेमंत पाटील यांनी सांगितले. हिंगोली शहरात उद्योग भवन नसल्यामुळे नवीन उद्योग भवन उभारण्यासाठी 12 कोटी रुपयांची तरदूत करण्यात आली आहे. उद्योगांसाठी सोयी सुविधा उभारण्यासाठी ६३ कोटी ररुपयांची मान्यता देण्यात आली आहे. याचं बरोबर MIDC कडून हदगांव व हिमायतनगर येथील बसस्थानकांसाठी निधी देण्यात आला आहे. यासोबत CMEGPY योजनेतून ६२० उद्योजक हिंगोली जिल्ह्यांमध्ये तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या सर्व मंजुरीमुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढा, कळमनुरी व हिंगोली तालुके नांदेड जिल्ह्यातील किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर आणि यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, उमरखेड, महागाव या सर्व तालुक्यांना या ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पामुळे फायदा होणार आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील अतिरिक्त एक लाख एकर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील जलसंपदा, उद्योग, आरोग्य, ग्रामविकास, शिक्षण, परिवहन विकासासाठीच्या विषयांना विशेष प्राधान्य देऊन भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उद्योगमंत्री उदय सामंत साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब या सर्वांचे खासदार हेमंत पाटील यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment