किनवट : मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय कार्यक्रमांतर्गत समूह नृत्य स्पर्धेत पहिल्या गटातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंगारवाडीच्या 'मर मी मनता डोगाले ' या ठेकेबाज आदिवासी दंडार ढेमसा नृत्याने पहिला, सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्यमिक विद्यालयाच्या 'ना के मोरीया' या बंजारा नृत्याने दुसरा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवाडीच्या 'कुऱ्या चालल्या रानात ' या शेतकरी नृत्याने तिसरा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारखणीच्या 'देश रंगीला रंगीला ' या देशभक्ती नृत्याने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला.
याच स्पर्धेत दुसऱ्या गटातून (विशेष सादरीकरण) जि.प.प्रा.शाळा दहेली तांडाच्या 'मॉ तुझे सलाम' या नृत्याने पहिला , महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंघाच्या 'ओ देश मेरे शान पे सदक ' या नृत्याने दुसरा, जि.प.प्रा.शाळा बेंदीतांडाच्या 'घुंगट ओढोनेन घोगरा बांधलेन ' या बंजारा तीज नृत्याने तिसरा क्रमांक पटकाविला.
देशभक्ती गीत गायन स्पर्धेत पहिल्या गटातून सरस्वती विद्या मंदीर माध्यमिक शाळेने प्रथम , जि.प.प्रा.शाळा बेंदीतांडाने द्वितीय, जि.प.कें.प्रा.शा. दहेलीने तृतीय व जि.प.प्रा.शाळा नंदगाव तांडाने उत्तेजनार्थ बक्षिस मिळविले.
याच स्पर्धेत दुसऱ्या गटातून अशोक पब्लीक स्कूल पळशीने पहिला व जिल्हा परिषद (मुलांचे)ने दुसरा क्रमांक पटकाविला. पथनाट्य स्पर्धेत जि.प.प्रा.शा. सिंगारवाडीने प्रथम व जि.प.कें.प्रा.शा. दहेलीने द्वितीय पारितोषिक पटकाविले.
येथील उप विभागीय अधिकारी कार्यालयात सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कार्तिकेयन एस. यांचे हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहन झाले. यावेळी सूत्रसंचालक उत्तम कानिंदे यांनी सर्वांकडून प्रतिज्ञा घेतली. प्रा. आम्रपाली वाठोरे यांच्या नेतृत्त्वात मुलींनी राष्ट्रगीत व सुरेश पाटील यांनी मराठवाडा गीत गाईले. त्यांना की बोर्ड उमेश ताटेवार, तबला शिवकुमार कोंडे, प्रशांत खाडे, ऍक्टोपॅड राहूल तामगाडगे यांनी साथ संगत केली. विद्यार्थ्यांनी बहारदार सादरीकरण केले. सारखणीच्या सोनल चव्हाण या विद्यार्थिनीने उत्स्फूर्त भाषण केले.
याप्रसंगी आमदार भीमराव केराम, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कार्तिकेयन एस., तहसिलदार डॉ. मृणाल जाधव, गट विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव, उप विभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे, गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने, पोलिस निरीक्षक दीपक बोरसे या मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील यशवंतांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र बहाल करण्यात आले.
गायन स्पर्धा परीक्षक आम्रपाली वाठोरे, सुरेश पाटील, समूह नृत्य स्पर्धा परिक्षक प्रा.डॉ. सुनिल व्यवहारे, राम बुसमवार व साथ संगत करणाऱ्या कलावंतांचा गौरव करण्यात आला. नृत्य स्पर्धेचे परिक्षक म्हणून प्रा.डॉ. पंजाब शेरे व आर्कि. महेश कटकमवार यांनी काम पाहिले होते.
No comments:
Post a Comment