खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या वतीने जवाहर विद्यालय प्रवेश पात्र व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, September 17, 2023

खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या वतीने जवाहर विद्यालय प्रवेश पात्र व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार

 


किनवट : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्याबदल सहा विद्यार्थ्यांचा व पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल 21 विद्यार्थ्यांचा खासदार हेमंत पाटील यांचे अभिंनदनपर प्रशस्तिपत्र देउन माहूर तालुक्यातील सहा विद्यार्थी व पालकांचा शिवसेना खासदार हेमंतभाऊ पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
    पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शाळांतील . गुणवान विद्यार्थ्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्याची योजना सन १९५४-५५ पासून कार्यान्वित केली आहे. सदर शिष्यवृत्ती योजनेत केंद्र शासनाच्या बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षण अधिकार या कायद्यामधील तरतूदी लक्षात घेवून या परीक्षेमध्ये स्पृहणीय यश संपादन करुन राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविणा-या विद्यार्थ्‍यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करावा , असे शासन निर्णयामध्ये नमूद केले आहे.
      परंतु शासन सत्कार करेल न करेल हा विषय बाजूला ठेवून स्वयंप्रेरणेने  गुणवंताचा गौरव झाला पाहिजे, हे ध्येय उराशी बाळगून वाटचाल करणारे हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंतभाउ पाटील यांनी आपल्या मतदार संघातील किनवट विधानसभा मतदार संघात येणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी, डोंगरी माहूर तालुक्यातील पालाईगुडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून पूर्व उच्च प्राथमिक शाळेतून शिष्यवृत्ती परिक्षेत व जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा उपक्रम आखला.
     याअंतर्गत रविवारी (ता.17 सप्टेंबर ) मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषद  प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा पालाईगुडा येथे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पात्र सहा विद्यार्थ्यांचा आणि शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण व शिष्यवृत्ती पात्र 21 विद्यार्थ्यांचा खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्यातर्फे जनसंपर्क अधिकारी सुनील गरड यांनी अभिनंदनपर प्रशस्तीपत्र व सुवर्ण पदक  देऊन  गौरव केला.
     यावेळी माहूर तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक, भाजपा तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर, माजी पंचायत समिती सदस्य किशोर पाटील पवार, सरपंच जनार्धन धुर्वे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दशरथ राठोड, विकास कपाटे, विनोद सूर्यवंशी, हिरासिंग चव्हाण, उत्तम धुर्वे, चंदन पवार, कुलदीप घोडेकर, श्रीकांत गादेवार, ग्रामसेविका आळणेताई, अनिल तोडसाम आदी मान्यवरांसह गुडेटवार,मेश्राम,राठोड,कांबळे, सोनकांबळे ( वानोळा तांडा ) हे सहायक शिक्षक उपस्थित होते.
     क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक सुरेंद्र कुडे यांनी सूत्रसंचालन केले. सहायक शिक्षक प्रेम जाधव यांनी आभार मानले.
    या कार्यक्रमास वानोळा, वानोळा तांडा, मनिरामथड, मनिराम तांडा, अनंतवाडी, पालाईगुडा येथील विद्यार्थी आणि पालक  मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते.



'शालेय जीवनातील स्पर्धा परिक्षेची पूर्वतयारी असलेली जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा व पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आहे. अतिदुर्गम, डोंगरी, आदिवासी किनवट तालूक्यातून विद्याथ्यांनी प्रज्ञा, प्रतिभेचा अविष्कार फलवून हे दैदिप्यमान यश संपादन केले याचा आम्हास अभिमान वाटतो. यशवंतांना उज्ज्वल भवितव्यासाठी

-हेमंत पाटील, खासदार, हिंगोली




"अतिदुर्गम डोंगरी आदिवासी भागातील असहाय्य परंतु गुणवंत विद्यार्थ्यांच्या प्रज्ञा प्रतिभेचा अविष्कार फुलवून त्यांना स्पर्धा परिक्षेसाठी तयार करणाऱ्या ह्या परीक्षा आहेत. याकामी शिक्षक बंधुनी सुटीमुक्त शाळा अभियान राबवून दिलेल्या समयदान व ज्ञानदानाचं हे फलित आहे. म्हणूनच शिक्षक व विद्यार्थी गौरवास पात्र आहेत. त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! 
-राजश्रीताई हेमंत पाटील ,
अध्यक्षा , गोदावरी परिवार , नांदेड "

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News