प्रबोधन चळवळीतील शिलेदार सुदाम माधव मुनेश्वर यांचे निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Sunday, September 17, 2023

प्रबोधन चळवळीतील शिलेदार सुदाम माधव मुनेश्वर यांचे निधन

 


किनवट : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात वास्तव्य करणारे , धानोरा (दिगडी ) येथील मूळनिवासी प्रबोधन चळवळीतील शिलेदार सुदाम माधव मुनेश्वर (वय 92 वर्षे ) यांचे शनिवारी (ता.16 सप्टेंबर 2023 ) सायंकाळी 05.20 वाजता राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.

       रविवारी (ता.17 सप्टेंबर 2023 ) दुपारी 11.30 वाजता त्यांच्या घरून त्यांची प्रेतयात्रा निघणार असून येथील बसस्थानका जवळील माहूररोडवर असलेल्या शांतीभूमी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

        त्यांचे पश्चात पत्नी, तीन मुलगे, चार मुली, दोन बहिणी, एक भाऊ (प्रसिद्ध गायक गंगाराम मुनेश्वर), सूना , जावई , नातवंडे असा मोठा परिवार असून वन विभागातील निवृत कर्मचारी , सामाजिक कार्यकर्ते तथा कवी मधुकर सुदाम मुनेश्वर, प्रसिद्ध ढोलकी/ तबला वादक उत्तम सुदाम मुनेश्वर व रविंद्र सुदाम मुनेश्वर यांचे ते वडील होत.

        "बुद्ध, फुले, आंबेडकर'  हा विचार महाकवी वामनदादांचा श्वास व उर्जाकेंद्र होते.  त्यांच्या प्रमाणेच डोक्यावर व्हार्मोनियम, तबला घेऊन महाराष्ट्र नव्हे तर तेलंगाणा, आंध्रप्रदेशातील घराघरांत, खेड्या -पाड्यात, वाडी -तांड्यात जाऊन आपल्या ओजस्वी वाणीतून ; तर कधी प्रबोधनकार गायकांना साथ संगत करून हा परिवर्तनवादी विचार  पोहचविण्याचे काम तहहयात त्यांनी केले आहे. जुन्या पिढीतील  गायक , वादक , कलावंत , प्रबोधन चळवळीतील शिलेदार सुदाम माधव मुनेश्वर यांच्या निधनाने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पावन स्मृतींना समस्त मुनेश्वर परिवार, गायक, कलावंत व धम्मबांधव यांनी  विनम्र अभिवादन करून आदरांजली अर्पिली आहे.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News