कर्मावर निष्ठा ठेवून काम केल्यासआनंद मिळतो -गट शिक्षणाधिकारी नंदकुमार कुलकर्णी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, July 31, 2024

कर्मावर निष्ठा ठेवून काम केल्यासआनंद मिळतो -गट शिक्षणाधिकारी नंदकुमार कुलकर्णी

 

उमरी ( रे.स्टे. ) : केंद्र प्रमुख एस.आर. खांडरे यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात प्रास्ताविक करतांना केंद्रिय मुख्याध्यापक मधुकर पवार, मंचावर उपस्थित गट शिक्षणाधिकारी नंदकुमार कुलकर्णी, विस्तार अधिकारी देविदासराव नारमोड, शंकरराव बेळकोणे, उच्च श्रेणी मुख्याध्यापक एन.पी.नागशेट्टी, एन. बी. कदम, शा. व्य. समितीचे अध्यक्ष शिवाजी पवळे, सत्कार मूूर्ती व त्यांच्या पत्नी

उमरी (रे.स्टे. ) :  'कर्मावर निष्ठा ठेवून काम केल्यास आनंद मिळतो,' असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी नंदकुमार कुलकर्णी यांनी केले. ते ढोलउमरी संकुलाचे केंद्रप्रमुख  एस. आर. खांडरे यांच्या सेवापुर्तीनिमित्त  आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

         37 वर्षाच्या सेवेनंतर श्री. खांडरे हे नियत वयोमानानुसार 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. यनिमित्त केंद्रीय प्राथमिक शाळा ढोलउमरी येथे सेवापुर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षणाधिकारी नंदकुमार कुलकर्णी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी  देविदासराव नारमोड,  शंकरराव बेळकोणे, उच्च श्रेणी मुख्याध्यापक  एन.पी.नागशेट्टी, एन. बी. कदम, शा. व्य. समितीचे अध्यक्ष  शिवाजी पवळे आदीं मान्यवरांची उपस्थित होती.

कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाली.

           शाळेच्या प्रांगणात आयोजित सोहळ्यात निरोप मूर्ती  एस. आर. खांडरे यांचा कपडेरूपी आहेर, भेटवस्तू, शाल -श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी अनिल कांबळे, प्रमोद नंदेश्वर, विस्तार अधिकारी देविदासराव नारमोड, एस. एल. बेळकोने, पंचकिरण कंधारे, दत्ता चिंताके आदींची श्री. खांडरे यांच्याविषयीं कृतज्ञता व्यक्त करणारी समयोचित भाषणे झाली.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय मुख्याध्यापक मधुकर पवार यांनी केले.  खंडू नागरगोजे यांनी सुरेख सूत्रसंचालन  केले. 

         कार्यक्रम यशस्वीतेसाठी ढोलउमरी संकुलातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक वृंदाचे सहकार्य लाभले. त्यातही मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त प्रा. शा. कारला शाळेच्या टीमने विशेष पुढाकार घेतला.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News