उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणुक पार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, September 24, 2024

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणुक पार

 



मुंबई, ता. २४ ( सुरेश नंदिरे) : मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघातील सिनेट निवडणूक मुंबईत पार पडली. मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रातील ३८ मतदान केंद्र आणि ६४ बुथवर ही निवडणूक पार पडली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही निवडणूक पार पडली आहे. मुलुंड येथे टोपीवाला केळकर तर भांडुप येथे मेनन महाविद्यालयात निवडणुक पार पडली. युवासेना कार्यकारणी सदस्या राजोल संजय पाटील व त्यांच्या टिमने ईशान्य मुंबईतील निवडणुक केंद्रावर जाऊन निवडणुक प्रक्रियेची पाहणी करीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन पाहणी केली. 


      मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ही राजकीय शिरकाव झाल्याने या निवडणुकीलाही राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. सिनेट निवडणुक पुढे घेण्याचा प्रयत्न करणा-यांना मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका देत निवडणुक ३ ऑगस्टच्या अधिसुचनेला अनुसरुन घेण्याचा आदेश दिला होता. युवासेनेच्या याचिकेवर शनिवारी सुट्टीच्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. त्यानुसार सिनेट निवडणुक पार पडली. 


     सिनेटच्या १० जागांसाठी हे मतदान झाले. यासाठी युवासेना, अभाविप, सम्यक विद्यार्थी, मनविसेसह इतर काही पुरोगामी संघटनांचे २८ उमेदवार निवडणुक रिगंणात होते. तर १३ हजार ४०६ मतदार आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News