गावकरी व महिलांच्या पुढाकारातून गावांचा कायापालट शक्य – सीईओ मेघना कावली #ग्राम दरबार: हाडोळी येथे ग्रामस्थांशी संवाद - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, April 16, 2025

गावकरी व महिलांच्या पुढाकारातून गावांचा कायापालट शक्य – सीईओ मेघना कावली #ग्राम दरबार: हाडोळी येथे ग्रामस्थांशी संवाद


नांदेड, १६: गावकरी व महिलांच्या सामूहिक प्रयत्नातून गावांचा कायापालट शक्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले.

       भोकर तालुक्यातील हाडोळी येथे एक दिवस गावकऱ्यांसाठी या उपक्रमाअंतर्गत आज ग्रामदरबार आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. या कार्यक्रमास उप विभागीय अधिकारी प्रवीण मेघशेट्टी, गट विकास अधिकारी एम.एन. केंद्रे, सहाय्यक गटविकास अधिकारी अनिता सरोदे, सरपंच अनिता अमृतवाड, उप अभियंता व्ही.ए. येरोळकर, सेवा समर्पण संस्थेचे दिगंबर देशमुख, विठ्ठल फुलारी, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रणयकुमार चाटलावार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

      ग्रामदरबार हा उपक्रम छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांच्या संकल्पनेतून सुरु झाला असून, शासनाच्या विविध योजनांची माहिती थेट ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली पुढे म्हणाल्या, स्वच्छता ही आरोग्याची गुरुकिल्ली असून, हाडोळी ग्रामपंचायतीने या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. हा बदल महिलांच्या सक्रिय सहभागामुळे शक्य झाला आहे. ग्रामपंचायतीअंतर्गत सध्या १४ महिला बचत गट कार्यरत असून, त्यांना नियमित प्रशिक्षण दिले जात आहे.


      प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी चार बचत गटांना एकूण १३ लाख ६० हजार रुपयांचा धनादेश सीईओ मेघना कावली यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. बचत गटांनी घेतलेल्या कर्जांमधून उत्तम व्यवसाय करून स्वतःचा आर्थिक विकास साधावा, असेही सीईओ मेघना कावली म्‍हणाल्‍या. ग्रामपंचायतीच्या लोकसहभागातून गावाचा सर्वांगीण विकास साध्य झाला असून, इतर गावांनी हाडोळीचा आदर्श घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र यांना भेटी दिली. गावात गाव फेरी करून गावाची पाहणी देखील केली.

       कार्यक्रमास माधव अमृतवाड, चेतनकुमार पाटील, मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार, जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे, पंचायत विभागाचे विस्‍तार अधिकारी एस.टी. शेटवाड, कृषी विस्‍तार अधिकारी डी. के. पाटील, तालुका गट समन्वयक प्रदीप वाठोरे, ग्रामपंचायत अधिकारी अरविंद मुनगे तसेच सेवा समर्पण संस्थेचे गंगाधर तमलवाड, उत्तम जाधव, बालाजी तुमवाड, मुख्याध्यापक मोरे, अनुसया पाटील, दुर्गा  कीनेवाड, विजयालक्ष्मी कृष्णुरे दिगंबर लालोंडे, रेखा वाघोळकर, मारोतराव मुंडकर, अशोक दुधारे, बाबुराव तोटावार यासह प्रतिष्ठित व्यक्ती, महिला व गावकरी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News