गावचा नागरिक कसा असावा.. !
स्वतः बदला! जग आपोआप बदलेल!!
-सुहास दत्ता गायकवाड
बऱ्याच गावात नागरिकांमध्ये चर्चा चालू असतात. सरपंच असा असावा सरपंच तसा असावा.
परंतु गावात राहणारा नागरिक कसा असावा. याबद्दल कुणीच चर्चा करत नाही..
बहुतांश गावात नागरिक रस्त्यावर गुरे ढोरे शेळ्या बांधतात.
रस्त्याच्या कडेला अगदी चिकटून खतासाठी उकिरडे करून शेण कचरा टाकतात.
गावातील मुख्य रस्त्यावरून व अंतर्गत रस्त्यावरून मोटार सायकल सुसाट चालवतात.
व चार चाकी वाहने रस्त्यावर लावतात. ज्यामुळे लोकांना रस्त्यावरून ये जा करण्यासाठी अडथळा निर्माण होतो. रस्त्यावर जळण लाकूड ढीग लावून ठेवतात,घरातील सांडपाणी जाऊन बुझून रस्त्यावर सोडतात, प्लास्टिकचा कचरा नाल्यांमध्ये टाकतात.
ही खरी प्रत्येक गावाची शोकांतिका आहे.
नदी स्वच्छ ठेवणे. आपले गाव स्वच्छ ठेवणे.
सरपंच धार्मिक स्थळासाठी निधी आणून इमारत उभी करू शकतो, पण तिथे स्वच्छता ठेवणे आपले कर्तव्य आहे.
प्रत्येकाने आपले गाव स्वच्छ ठेवले पाहिजे.
शेवटी सरपंच पद हे मर्यादित कालावधीसाठी आहे .
नागरिक हे पद जीवनमान असेपर्यंत आहे.
स्वतः पासून सुरुवात करा सुज्ञ नागरिक बना.
आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. आणि आपलं गाव आदर्श बनवा. ज्येष्ठ लोकांचे सहकार्य घ्या. वादविवाद टाळा. ज्यांना ज्या विषयाचे ज्ञान आहे त्यांनी स्वतःहून पुढे या.
प्रत्येकाला प्रत्येक माणूस वाईट वाटतो. तर मग चांगले कोण एकदा हा प्रश्न स्वतःला डोके शांत ठेवून डोळे झाकून विचारा..
!! स्वतः बदला!!
!!जग आपोआप बदलेल!!
✍🏻 सुहास दत्ता गायकवाड,
घोटी ता. किनवट जि नांदेड.




No comments:
Post a Comment